आम्हाला सत्ता हवी म्हणून आम्ही सत्तापरिवर्तन केले नाही. तर गेल्या अडीच वर्षात राज्यात ज्या प्रकारे घटना घडल्या. त्यामुळे आम्ही सत्तापरिवर्तन केले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुखाखतीत ते बोलत होते. दरम्यान, यावेळी त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचे कारणही सांगितले.

हेही वाचा – “मला तरी कुठे माहिती होतं की मी CM होणार, हा तर…”; शिंदे ‘महाशक्ती’ पाठीशी असल्याचा उल्लेख करत म्हणाले, “स्वत:ची संपत्ती…”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आम्हाला सत्ता हवी म्हणून आम्ही सत्तापरिवर्तन केले नाही, तर गेल्या अडीच वर्षात राज्यात ज्या प्रकारे घटना घडल्या होत्या. त्यामुळे आम्ही सत्तापरिवर्तन केले. मात्र, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीपदी राहता आणि त्यानंतर दुसऱ्या सरकारमध्ये सहभागी होता, तेव्हा तुम्ही सत्तेसाठी हपापलेले आहात, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, असा निर्णय घेतल्यानंतर मला वरिष्ठांनी सांगितले की, तुम्ही राज्यातील महत्त्वाचे नेते आहात. तसेच तुम्ही यापूर्वी मुख्यमंत्रीही राहिले आहात. त्यामुळे आम्हाला सरकार चालवण्यासाठी तुमच्या अनुभवाची आवश्यकता आहे. म्हणून मी सरकारमध्ये सहभागी होणाचा निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच आज जेव्हा मी मागे वळून बघतो, तेव्हा मला हा निर्णय योग्य वाटतो”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “बाळासाहेबांच्या स्मारकात तोतयागिरी करणारे…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

“विकसीत भारताचे जे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी बघितले आहे. ते स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जर भारताला ५ ट्रिलीयनची अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर महाराष्ट्राला १ ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा टप्प्यापर्यंत पोहोचावे लागेल. त्याशिवाय हे शक्य नाही. देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे”, असेही ते म्हणाले.

Story img Loader