शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षांकडून अपक्षांना आपल्याकडे खेचण्यामध्ये चढाओढ सुरू आहे. जास्तीत जास्त अपक्षांना आपल्याकडे खेचून आपली ताकद वाढवण्यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागांवर समाधान मानावे लागले. जास्तीत जास्त अपक्ष आपल्याकडे घेऊन सत्तावाटपात मोठा वाटा मिळवण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे.

शिवसेनेला सात तर भाजपाला १० अपक्ष आमदारांनी आतापर्यंत पाठींबा दिला आहे. त्यामुळे भाजपाचे संख्याबळ १०५ वरून ११५ झाले आहे तर शिवसेनेचे ५६ वरून ६३ असे संख्यबळ झाले आहे. इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आव्हाडे आणि अजून एक अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. भाजपा नेते गिरीश महाजन, जयकुमार रावल अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपाला पाठिंबा देणारे आमदार

शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार