राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या पवारांच्या मागणीवर बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळातील मदतीबद्दल भाष्य केल्यानंतर अजित पवारांनी फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.
नक्की पाहा >> “जनतेचा काय दोष? त्यांनी काय पाप केलंय?” असा संतप्त सवाल विचारत अजित पवार म्हणाले, “मी गडकरींनाच फोन करुन…”
पूर आणि अतिवृष्टीसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आल्यानंतर फडणवीस यांनी एक आठवड्यानंतर ही मदत दिली जाईल अशी माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी यांनी नुकसानीचा अंदाज घेतला, तेव्हा ५० टक्के पंचनामे झाले होते. उर्वरित पंचनामे आठवडाभरात झाल्यावर मदतीचा निर्णय होईल. महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टी, चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेण्यास सात महिन्यांचा अवधी लावला आणि केंद्र सरकारकडे बोट दाखवत राहिले. आम्ही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवू. पण केंद्राच्या निर्णयाची वाट न पाहता राज्याच्या निधीतून पूरग्रस्तांना व आपत्तीग्रस्तांना मदत दिली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टी बाधितांच्या मदतीवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली; ‘सात सात महिने तुम्ही मदत केली नाही’वाल्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी सुनावलं
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या पवारांच्या मागणीवर बोलताना फडणवीसांनी केलेली महाविकास आघाडी सरकारवर टीका
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-07-2022 at 09:21 IST
TOPICSअजित पवारAjit Pawarदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJPराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis vs ajit pawar over providing relief to rain affected farmers in maharashtra scsg