तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील कॉरिडॉरच्या मुद्द्यावरुन स्थानिक पातळीवरील राजाकरण चांगलेच तापले आहे. वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २०३० कोटी ७० लाख रूपये खर्चा विकास आराखडा तयार केला असताना हा कॉरिडॉर रद्द व्हावा या मागणीसाठी पंढरपुरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. हा कॉरिडॉर रद्द न झाल्यास स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. तर काहीजण कॉरिडॉरच्या मुद्यावर पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची आणि पुढच्या वर्षी आषाढी यात्रेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी आमंत्रित करण्याची भाषा बोलत आहेत. असं असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या कॉरिडॉरसंदर्भात ठाम असून काहीही झालं तरी हा कॉरिडॉर तयार होणारच असं सांगत आहेत. मात्र आता याच मुद्द्यावरुन थेट फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल असा इशारा भाजपाचेच माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामींनी दिलाय. विशेष म्हणजे स्वामींनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत हा इशारा दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा