विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‘अजित पवार नॉट रिचेबल’ अशा आशयाचा बातम्या गेल्या आठवड्यात माध्यमांवर दिसत होत्या. अजित पवार ८ एप्रिल रोजी एका कार्यक्रमातून अचानक निघून गेले आणि त्यानंतरचे कार्यक्रम त्यांनी रद्द केले. त्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल आहेत अशा बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. त्याचदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्वीट केला. “किळसवाणं राजकारण मी पुन्हा येईन” असं कॅप्शन त्यांनी दिलं होतं. त्यामुळे अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असल्याचा चर्चा सुरू झाल्या. त्यावर दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी माध्यमांसमोर येऊन उत्तर तर दिलचं, परंतु माध्यमांची कानउघडणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ९ एप्रिल रोजी सकाळी नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली आणि ते नॉट रिचेबल असण्याच्या बातम्या खोट्या ठरवल्या. दरम्यान, पवार यांनी त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर नाराजी देखील व्यक्त केली. पवार म्हणाले की, काल काम करत असताना मला पित्ताचा त्रास होऊ लागला. जागरण आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. तो खूप वर्षांपासूनचा त्रास आहे. त्यानंतर मी डॉक्टरांकडून औषधं घेतली आणि झोपलो. आज बरं वाटू लागल्यानंतर सकाळपासून मी कार्यक्रम सुरू केले. परंतु याच काळात माध्यमं कसल्याही बातम्या दाखवत होती. त्या बातम्या पाहून मला वाईट वाटत होतं.

हे ही वाचा >> “…तेव्हा कोणाचे पाय पकडले?” नितेश राणेंचा ठाकरे पिता-पुत्रांना सवाल, म्हणाले, “लवकरच गौप्यस्फोट…”

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या घटनेवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई तक वृत्तवाहिनीच्या बैठक या मुलाखतीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, परवा अजितदादा कुठल्या तरी पुण्याच्या कार्यक्रमातून निघून गेले. त्या दिवशी मी मुंबईतल्या घरी फाइल्स क्लिअर करण्याचं काम करत होतो. त्यावेळी “परत सुरू झालं” अशा चर्चा सुरू झाल्या. पण त्या दिवशी मी माझ्या घरी काही पत्रकारांना गप्पा मारायला बोलावलं होतं, त्यामुळे पत्रकार माझ्याच घरी होते. पण तिकडे चर्चा अशा सुरू होत्या की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नागपूरला भेटले. मी मुंबईत आणि अजित पवार कुठे आहेत हे मला माहिती नव्हतं.