धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या श्रध्देपोटी एका भाविकाने देवीचरणी नवसपूर्ती म्हणून ५४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. भाविकाने देवीचरणी मौल्यवान दान अर्पण केल्याबद्दल जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडेकर यांनी भाविकाचा सत्कार केला.

ठाणे जिल्ह्यातील एका देवीभक्ताने नवसपूर्ती म्हणून मोठ्या श्रध्देने देवीसाठी ५४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. देवीवर असलेल्या या कुटुंबियांच्या निस्सीम श्रध्दा आणि समर्पन भावनेचा आदर करत तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे भाविक कुटुंबीयांचा देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडेकर, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, धार्मिक विभागाचे अमोल कर्डीले इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

Story img Loader