पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावातील भाविकांच्या वाहनाचा परतीच्या प्रवासावेळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावजवळ मोठा अपघात झाला आहे. आज (२२ मे) सकाळी सहाच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी ही शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलारवर धडकली. या अपघातात ३ भाविक जागीच ठार झाले आहेत. तर ७ भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. काही जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर या भाविकांना पुढील उपचारांसाठी अकोल्याला हलवण्यात आलं आहे. वाहनचालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. काल (२१ मे) रात्रीपासून भाविकांचा हा प्रवास सुरु होता. भाविक अगदी त्यांच्या घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरीच्या प्रवेशद्वारानजिक आज सकाळी ही दुर्घटना घडली. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे. रात्रभर प्रवास करून हे भाविक घरी पोहोचण्याच्या बेतात होते. विठुरायाच्या दर्शनाने जीवन सफल झाल्याची भावना घेऊन परतणाऱ्या या भाविकांना समोर काळ उभा आहे याची कल्पनाही नव्हती. रात्रभर या वाहनाचा चालक वाहन चालवत होता. त्याला झोप येत होती. परंतु घर आता अवघ्या काही मिनिटांवर आहे, म्हणून तो तसाच वाहन चालवत राहिला. परंतु घरी पोहोचायच्या काही वेळ आधी हा अपघात झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotees returning from pandharpur car accident at shegaon buldhana 3 killed 7 injured rno news asc
Show comments