वाई: अवघ्या १२ व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प आई-वडील, पालकांशिवाय पूर्ण करणारी साताऱ्याची धैर्या कुलकर्णी देशातील पहिली मुलगी ठरली आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, हे आव्हानात्मक स्वप्न अनेकांचे स्वप्नच राहते. हे स्वप्न सत्यात उतरवण्याची गौरवास्पद कामगिरी साताऱ्यातील धैर्या विनोद कुलकर्णी हिने केली आहे. तीही वयाच्या फक्त बाराव्या वर्षी.

एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणे हे एक मोठे आव्हान असते. तेही ‘एव्हरेस्ट’समच. जिद्द, चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत या चतुसूत्रीने एव्हरेस्ट शिखर सर करणारे अनेकजण आहेत. कित्येक वर्षे त्यासाठी मेहनत घेतली जाते. एव्हरेस्ट शिखर सर करण्यापूर्वी सर्वाधिक महत्वाचे असते, ते एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरीत्या पूर्ण करणे. कारण, भल्याभल्यांनाही हा कॅम्प पूर्ण करताना दमछाक होते, तर अनेकांना कॅम्प अर्धवट सोडून पाठिमागे वळावे लागते.

Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार

हेही वाचा – पहिल्या ‘आधार कार्ड वुमन’चे दुर्दैवाचे दशावतार! कार्ड आहे पण बँक खात्यात मात्र…

एव्हरेस्ट बेस कॅम्प ही मोहीम जगभरातील अनेकांची आवडती गिर्यारोहण मोहीम असते. दरवर्षी जगभरातून हजारो गिर्यारोहक आपल्या शारीरिक क्षमतेचा कस अजमावण्यासाठी काठमांडूत जमा होतात. यामोहिमेत भरवशी निसर्गाबरोबरच जाणाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी लागते. कमी ऑक्सिजन व उंचावरील विरळ हवेत होणारे विलक्षण शारीरिक आजार या सर्वांचा सामना करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहभागी गिर्यारोहक जीवाचे रान करत असतात.

धैर्या विनोद कुलकर्णी हिने पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला. गिर्यारोहक कैलास बागल यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सातत्याने सातारा जिल्ह्यासह परिसरातील अनेक ठिकाणांनी ट्रेक पूर्ण केले. कैलास बागल यांचे प्रशिक्षण तिला सातत्याने ऊर्जा देत राहिले, तर सातारा जनता सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन, पॅनेलप्रमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, आई ज्योती शिक्षिका यांची प्रेरणा तिला बळ देत राहिली.

हेही वाचा – “… तेव्हा देवेंद्र फडणवीसांना कुणी नमस्कारही करणार नाही”, रवींद्र धंगेकरांची खोचक टीका

एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करण्यासाठी धैर्याने एव्हरेस्टकन्या प्रियंका मोहिते, गिर्यारोहक गगन हल्लुर यांचे मार्गदर्शन घेतले. हा कॅम्प ५५४५ मीटर इतका उंचीचा आहे. धैर्याने दररोज १० ते १५ किलोमीटर असे चालत तब्बल १४ दिवसांमध्ये १३० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. तोही मायनस १० डिग्री तापमानामध्ये. आई-वडिल सोबत नसताना अवघ्या १२ वयाच्या मुलीने बेस कॅम्प पूर्ण करणे हे एकमेव उदाहरण ठरले आहे. धैर्या येथील गुरुकूल स्कूलमध्ये इयत्ता ६ वीमध्ये शिक्षण घेत आहेत. तिच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

धैर्या साहसी आहे. वयाच्या ६ व्या वर्षापासून ती ट्रेकींग करते. प्रचंड जिद्दी असलेल्या धैर्याला आई-वडिलांचे पाठबळ मिळत आहे. परीक्षा कालावधीतही तिने सराव सोडला नाही. पहाटे उठून दररोज तास-दीड तास तिने सराव केला. जिद्द, तीव्र इच्छाशक्ती, मेहनत या बळावर तिने एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला. धैर्याचे अभिनंदन. – कैलास बागल, प्रशिक्षक, सह्याद्री ट्रेकिंग.