सोलापूर : माढ्यात भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार राहिलेले धैर्यशील मोहिते-पाटील डावलून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच पुनश्च संधी मिळाल्यामुळे मोहिते-पाटील समर्थकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. मात्र मोहिते-पाटील कुटुंबीय कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत आणि पुढे पाहा या भूमिकेत असताना त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी वाजविण्यास सुरुवात केल्यामुळे मोहिते-पाटील यांच्या पुढील भूमिकेविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या माढा मतदारसंघात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून येणे शक्य झाले होते. आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पाठिंब्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे. दरम्यान, खासदार निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यात बेबनाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उभे राहण्याची जोरदार तयारी केली होती. खासदार निंबाळकर व मोहिते-पाटील यांच्यात सुरू झालेली रस्सीखेच चर्चेचा विषय ठरला असताना अखेर भाजपने खासदार निंबाळकर यांना पुनःश्च संधी दिली. त्यामुळे मोहिते-पाटील गटाला धक्का बसला आहे.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’

हेही वाचा – भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू झालेले नाराजीनाट्य चार दिवसांत संपेल, गिरीश महाजन यांचा दावा

हेही वाचा – सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक नाही – मंत्री खाडे

उमेदवारीविषयी मोठा आत्मविश्वास बाळगलेल्या मोहिते-पाटील गटात आता कमालीचे नैराश्य आणि संताप पसरला असून समाज माध्यमांवर मोहिते-पाटील समर्थक आक्रमक होऊन, माढा-निंबाळकरांना पाडा, असा धोशा लावला आहे. एवढेच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत धैर्यशील मोहिते-पाटील हे माघार न घेता माढ्यातून निंबाळकर यांना आव्हान देणारच, अशी गर्जनाही त्यांचे समर्थक करीत आहेत. मोहिते-पाटील यांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी वाजवावी, असा दबावही समर्थकांकडून वाढत आहे. समाज माध्यमांवर तुतारी वाजविली जात असून सोबत शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतिमाही झळकावल्या जात आहेत. तथापि, उमेदवारी डावलली गेल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून स्वतः मोहिते-पाटील कुटुंबीय मौन बाळगून असून त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यांची भूमिका येत्या एक-दोन दिवसांत स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.