Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणाला महिना उलटला तरीही त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. वाल्मिक कराडविरोधात मकोका लावण्यात आलेला नाही. तर, एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, आज याविरोधात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आंदोलनही केले होते. हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून सरकारला उद्या सकाळी १० वाजेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे.

वाल्मिक कराड वगळता इतर आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, विरोधी व सत्ताधारी पक्षांमधील नेते, आमदार वाल्मिक कराडवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करत आहेत. दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्या जात आहेत. भावाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी धनंजय देशमुख कायदेशीर लढाई लढत आहेत. मात्र, त्यांना ही लढाई लढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे संतापलेल्या धनंजय देशमुख यांनी आज (१३ जानेवारी) आंदोलन केलं. धनंजय देशमुखांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >> Santosh Deshmukh : “संतोष देशमुखांना भीती वाटत होती, गुंड प्रवृत्तीचे लोक…”, हत्येच्या दोन दिवस आधी काय घडलं? पत्नीने सांगितला घटनाक्रम!

तसेच, मोबाइल टॉवरवर चढून जीव देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज ते टॉवरवर चढले. तर, मस्साजोगच्या ग्रामस्थांनी देखील गावात तीव्र आंदोलन केलं. धनंजय देशमुखांनी आत्महत्या करू नये यासाठी प्रशासन व अनेक नेत्यांनी त्यांची विनंती केली. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय देशमुखांना विनवण्या केल्या. त्यानंतर तब्बल दोन तासांनी त्यांनी आपलं आंदोलन थांबवलं व ते टॉवरवरून खाली उतरले. मात्र, ३५ दिवसांनंतरही कोणत्याही आरोपीला कठोर शासन झालेलं नसल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांची आक्रमक भूमिका

आंदोलन स्थगित केल्यानंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीनेही भूमिका मांडण्यात आली. त्यातील एका ग्रामस्थाने म्हटलं की, “मनोज जरांगे यांच्या विनंतीनंतर मी हे आंदोलन स्थगित केलं आहे. उद्या सकाळी १० वाजेपर्यंत गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही थांबणार नाही. आज मी एकटाच आत्मदहन करणार होतो, पण संपूर्ण गाव अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करू”, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Story img Loader