अध्यात्माचे पावित्र्य कसे जपायचे, याचे संस्कार आपल्यावर आई-वडिलांकडूनच झाले आहेत. या संस्कारांशी आपली बांधिलकी आहे. त्यामुळे अध्यात्मिक व्यासपीठाचा वापर आपण राजकारणासाठी करणार नाही, असे सांगून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका करणे टाळले. मात्र योग्य व्यासपीठावर आपल्यावरील आरोपांना सडेतोड उत्तरे देऊ, असा इशारा त्यांनी दिला. पंडितअण्णा मुंडे व (स्व.) गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षांचा वारसा मीच खऱ्या अर्थाने चालवत आहे. त्यामुळे माझ्याविषयी पसरवण्यात येणाऱ्या गैरसमजांना थारा देऊ नका, असे आवाहन मुंडे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यात गहिनीनाथ गडावरील ८४ व्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास शुक्रवारी मुंडे यांनी हजेरी लावली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी या सप्ताहास हजेरी लावली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती.
आरोपांना योग्य वेळी सडेतोड उत्तर – धनंजय मुंडे
अध्यात्माचे पावित्र्य कसे जपायचे, याचे संस्कार आपल्यावर आई-वडिलांकडूनच झाले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 30-04-2016 at 00:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde