Dhananjay Munde Bombay High Court Agricultural Materials : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणावरून राज्याचे विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता आणखी एका गोष्टीमुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याआधीच्या सरकारमध्ये (शिंदे सरकार) कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी घेतसेल्या एका निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंडे कृषीमंत्री असताना कोणत्या आधारावर त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केले? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. तसेच पुढील दोन आठवड्यात यासंदर्भात स्पष्टीकरण देखील मागितलं आहे. राज्यात कृषी साहित्य खरेदीसाठीची डीबीटी योजना मुंडे कृषीमंत्री असताना बंद करण्यात आली आणि कृषी साहित्य खरेदी करून शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सरकारने १०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. याअंतर्गत स्प्रे पंप व इतर कृषी साहित्य खरेदी करून शेतकऱ्यांना पुरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या खरेदीत घोटाळा झाल्याचा दावा केला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा