राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट-भाजपा संयुक्तपणे सत्ताशकट हाकत आहेत. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर साधारण महिन्याभराने राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. यावेळी बंडखोरी केलेल्या शिवसेनेतील अनेक आमदारांमध्ये नाराजी दिसून आली होती. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीदेखील स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, लवकरच दुसरा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये नाराज नेत्यांसह भाजपाच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते तथा पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याआधीही त्यांनी (पंकजा मुंडे) मंत्री म्हणून काम केलेलं आहे. भाजपा मला विचारून मंत्र्यांची यादी ठरवत नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. ते पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा