राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे सर्व पदांसाठी पात्र आहेत असं वक्तव्य केलं. त्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेत उमेदवारी मिळण्यावरून अनेक तर्कवितर्क लावले गेले. मात्र, भाजपाने आपल्या दोन राज्यसभा उमेदवारांची नावं घोषित केल्यानंतर या चर्चेचा शेवट झाला. याबाबत पंकजा मुंडे यांना विचारलं असता त्यांनी त्यांनी आपल्याला कोणतीही इच्छा नसल्याचं आणि पक्ष काय ठरवेल यावरच आहे असं वक्तव्य केलं. यावरून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे सर्व जागांसाठी पात्र आहे असं म्हटलं होतं. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी पात्र आहे असं म्हटल्यावर इतर कोणीही त्या पात्र नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. मात्र, पात्र असणं आणि त्यांच्यावर जबाबदारी देणं यात अंतर आहे. हे अंतर फक्त कोठे अडचणीचं ठरू नये एवढंच आहे.”

“शेवटी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे”

संभाजीराजेंच्या राज्यसभा उमदेवारीवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “संभाजीराजेंच्या वडिलांनी खऱ्या अर्थाने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर संभाजीराजेंनी देखील ते मान्य केलं. शेवटी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्यामुळे कुठल्याही पदापेक्षा छत्रपतींचा मान, कुठल्याही खासदारकी, आमदारकी, मंत्रिपदापेक्षाही मोठा आहे, असं माझ्यासारख्या मावळ्याला वाटतं.”

हेही वाचा : फडणवीसांना काय सल्ला देणार विचारलं असता पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या “काही वाटत असेल तर…”

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

पंकजा मुंडे म्हणाल्या, “राज्यसभेसाठी माझं नाव तर चर्चेत नाही. मात्र, ज्यांना राज्यसभा उमेदवारी मिळाली आहे त्यांच्यासाठी मला आनंद आहे. पियुष गोयल यांना तिकिट मिळेल हे अपेक्षितच होतं. मी विमानात जाण्याआधी या नावांची घोषणा नव्हती. आता राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर झालीय. यात विदर्भाला संधी मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या अनिल बोंडे यांना उमेदवारी मिळाली त्यांनाही शुभेच्छा. मला कोणतीही इच्छा नाही. पक्ष काय ठरवेल यावरच आहे.”