आज शरद पवार यांची बीडमध्ये सभा होणार आहे. बीड हा धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. अशात आज शरद पवारांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी अजित पवारांना आशीर्वाद द्या अशी भावनिक साद घालत बीडमध्ये बॅनर झळकवले आहेत. बीडमध्ये शरद पवारांची सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे बॅनर चर्चेत आहेत.
२ जुलैला अजित पवार सरकारमध्ये
२ जुलै रोजी अजित पवार आणि त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या एकूण ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचप्रमाणे या सगळ्यांना नंतर मंत्रिपदंही देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली ही फूट आजही चर्चेत आहे. कारण पहिल्या २ जुलैचा अजित पवारांचा शपथविधी आणि ५ जुलैला झालेली सभा यानंतर या दोघांनी (शरद पवार आणि अजित पवार) एकमेकांच्या विरोधात बोलणं हे फारसं टाळलं आहे. तसंच या दोघांची भेटही चर्चेत आहे. अशात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी लावलेले बॅनर चर्चेत आहेत.
हे पण वाचा- राष्ट्रवादीचे पक्ष नाव, चिन्हाबाबत शिवसेनेप्रमाणेच निर्णयाची भीती; आयोगाच्या नोटिशीनंतर शरद पवार यांचे वक्तव्य
बॅनरवर शरद पवार यांना काय साद घालण्यात आली आहे?
साहेब, बीडमध्ये आपले हार्दिक स्वागत. कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या. आपला माणूस हक्काचा माणूस. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही बीडकर सदैव्य तुमच्यासह. असा मजकूर या बॅनरवर आहे. हा बॅनर चांगलाच चर्चेत आला आहे.
हे पण वाचा- “नात्यांमधला ओलावा आणि…”, शरद पवार-अजित पवार भेटीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
आज शरद पवार बीडमध्ये नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आमचा पक्ष फुटलेला नाही. काही लोकांनी वेगळा विचार केला आहे असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. तसंच पुण्यात चोरडिया यांच्या घरी जी भेट झाली त्यावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे सगळ्यांनीच स्पष्टीकरण दिलं. आता धनंजय मुंडे यांनी बॅनरवरुन घातलेली ही भावनिक साद शरद पवार ऐकणार का? अजित पवारांना आशीर्वाद देणार का? याचं उत्तर आजच्या सभेत मिळेलच.