राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवू लागल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय मुंडे यांना संध्याकाळच्या सुमारास छातीत वेदना जाणवू लागल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या कुटुंबीयांशी देखील त्यांनी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde faced mild heart attack admitted in breach candy hospital pmw