मागच्या लोकसभा निवडणुकीत बोगस मतदान करण्याची जबाबदारी आपण घेतली होती. मात्र यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर नसíगक मतदान होईल, असे जाहीर वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले. या बोगस मतदान वक्तव्याची दखल घेऊन गेवराई तालुका तहसीलदारांनी भाषणाच्या सिडीचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आयोगाच्या कचाटय़ात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खासदार गोपीनाथ मुंडे यांनीही निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ शनिवारी गेवराई येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा झाली. या सभेत बोलताना आमदार धनंजय मुंडे यांनी काका खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीका केली. मागच्या निवडणुकीत काकांच्या सांगण्यावरून बोगस मतदान करण्याची जबाबदारी आपल्यावर होती व ती आपण पूर्ण केल्याची कबुली दिली. धनंजय मुंडे यांचे हे वक्तव्य आक्षेपार्ह असून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याची तक्रार गेवराई तहसीलदारांकडे करण्यात आली. याबाबत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, भाषणाची संपूर्ण क्लिप वरिष्ठांकडे पाठवली असून आयोगाच्या सूचनेनुसार पुढील कारवाई होईल. सायंकाळी खासदार गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर आपण आयुष्यात कोणत्याच निवडणुकीत बोगस मतदान करून घेतलेले नाही. ज्यांनी असे वक्तव्य केले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा