Dhananjay Munde on Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेचे पडसाद आता राजकीय वर्तुळात देखील उमटताना दिसत आहेत. बीडमध्ये एक गुंड सरकार आणि मंत्र्‍यांच्या संरक्षात उघडपण धमकी देत आहे. उघडपणे त्याच्या अपहरण करून हत्या करण्यात आली. यानंतर विरोधीपक्षांकडून सरकारला जाब विचारला जात आहे. काँग्रेसचे नेते विजय वडट्टेवार यांनी बीडमधील घटनेतील आरोपींना सरकार आणि मंत्र्यांकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विधीमंडळ अधिवेशनादरम्यान सभाग्रहाच्या बाहेर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बीडमधील सरपंचाच्या हत्येवरून सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाला की, “बीडमध्ये एक गुंड सरकार व मंत्र्यांच्या संरक्षणात खुलेआम धमक्या देतो. तिथे सरपंचाला ज्या क्रूरपणे मारहाण करण्यात आली, त्याची हत्या करण्यात आली, एवढं भीषण कृत्य मी कधी पाहिलं नाही. लायटरनं त्याचे डोळे जाळले गेले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर उड्या मारून नाचण्यात आलं. हे काय चाललंय महाराष्ट्रात? हे काय बघतोय आपण?”.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Sanjay Raut On Dhananjay Munde and PM Modi Mumbai Visit
Dhananjay Munde : “…मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?”, PM मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याच्या मुद्यावर राऊतांचा थेट सवाल
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Case
Dhananjay Deshmukh : “…अन्यथा टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार”, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

दरम्यान सरकारवर होत असलेल्या आरोपांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “त्यांच्या (संतोष देशमुख) सख्ख्या भावांने म्हणजेच धनंजय देशमुखांनी यासंबंधी स्वतः वक्तव्य केलं आहे. त्यानंतर अतिशय घाणेरड्या घटनेत माझा संबध लावणं म्हणजे त्यांना याबाबतीत राजकारण आणायचं आहे. हा विषय आता सभागृहात मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्री स्वतः ही घटना का आणि कशी झाली? यासाठी कोण जबाबदार आहे? आतापर्यंत किती आरोपी अटक झाले? किती आरोपी अटक होणे बाकी आहेत? याबद्दल जबाबदारीपूर्वक सविस्तर निवेदन करणार आहेत”.

व्हायरल फोटोबद्दल धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

आरोपींबरोबरचा फोटो व्हायरल केला जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, “बीड जिल्हा असा आहे, की इथे अनेक जण येऊन फोटो काढतात. आता फोटो घेणाऱ्याला फोटो घ्यायचा असतो आणि आपल्याला द्यायचा असतो. त्याचा आग्रह आपल्याला टाळता येत नाही. पण वैयक्तिक जीवनात तो काय करतो याचा संबंध आमच्याशी येतच नाही. अशा घाणेरड्या प्रवृत्तींना, खून करणाऱ्या लोकांना आम्ही मदत करतोय, पाठबळ देतोय किंवा पाठीशी घालतोय असं कधी आम्हाला जमलं नाही. इतक्या वर्षांपासून आम्ही राजकारणात, समाजकारणात आहेत असं कधी केलं नाही”.

विरोधकांकडून आरोप होत आहे की आरोपींना राजकीय आश्रय मिळतोय, या मुद्द्यावर विचारले असता धनंजय मुंडे म्हणाले की, “कारवाई पहिल्याच दिवशी झाली. पहिल्या दिवशीच चार आरोपी अटक झाले, बाकीच्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीसांनी आठ वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत, त्यांनाही लवकर अटक केली जाईल”.

हेही वाचा>> “सिगरेटच्या लायटरनं त्याचे डोळे जाळले, मृतदेहावर उड्या मारल्या”, विरोधी पक्षांकडून बी…

या प्रकरणात खंडणी उकळणारी टोळी होती असे बोलले जात आहे, याबद्दल विचारले असता मुळात खंडणीचा मुद्दा यामध्ये आला कसा हा एक प्रश्न आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः निवेदन करतो असं म्हटल्यानंतर सभागृहाबाहेर त्यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्‍याने बोलणे हा सभागृहाचा अपमान वाटू शकतो असेही धनंजय मुंडे म्हणाले.

वाल्मीक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानदेखील हालत नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलें होतं, याबद्दल विचारले असता धनंजय मुंडे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीपासून ते महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यापासून माझी आणि पंकजा मुडे यांची खाली काम करणाऱ्या टीममध्ये असंख्य लोक आहेत. त्यांच्यापैकी एक वाल्मीक कराड देखील आहेत असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Story img Loader