Dhananjay Munde on Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेचे पडसाद आता राजकीय वर्तुळात देखील उमटताना दिसत आहेत. बीडमध्ये एक गुंड सरकार आणि मंत्र्‍यांच्या संरक्षात उघडपण धमकी देत आहे. उघडपणे त्याच्या अपहरण करून हत्या करण्यात आली. यानंतर विरोधीपक्षांकडून सरकारला जाब विचारला जात आहे. काँग्रेसचे नेते विजय वडट्टेवार यांनी बीडमधील घटनेतील आरोपींना सरकार आणि मंत्र्यांकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विधीमंडळ अधिवेशनादरम्यान सभाग्रहाच्या बाहेर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बीडमधील सरपंचाच्या हत्येवरून सरकारवर गंभीर आरोप केले . ते म्हणाला की, “बीडमध्ये एक गुंड सरकार व मंत्र्यांच्या संरक्षणात खुलेआम धमक्या देतो. तिथे सरपंचाला ज्या क्रूरपणे मारहाण करण्यात आली, त्याची हत्या करण्यात आली, एवढं भीषण कृत्य मी कधी पाहिलं नाही. लायटरनं त्याचे डोळे जाळले गेले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर उड्या मारून नाचण्यात आलं. हे काय चाललंय महाराष्ट्रात? हे काय बघतोय आपण?”

दरम्यान सरकारवर होत असलेल्या आरोपांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “त्यांच्या (संतोष देशमुख) सख्ख्या भावांने म्हणजेच धनंजय देशमुखांनी यासंबंधी स्वतः वक्तव्य केलं आहे. त्यानंतर अतिशय घाणेरड्या घटनेत माझा संबध लावणं म्हणजे त्यांना याबाबतीत राजकारण आणायचं आहे. हा विषय आता सभाग्रहात आणण्यात आला आहे आणि मुख्यमंत्री स्वतः ही घटना का झाली? कशी झाली? याची कारणे आणि कोण जबाबदार आहे? आतापर्यंत काय चौकशी झाली आणि किती आरोपी अटक झाले? किती आरोप अटक होणे बाकी आहे? याबद्दल सविस्तर शासनाकडून जबाबदारीपूर्वक मुख्यमंत्री निवेदन करणार आहेत”.

व्हायरल फोटोबद्दल धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

आरोपींबरोबरचा फोटो व्हायरल केला जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, “बीड जिल्हा असा आहे, की इथे अनेक जण येऊन फोटो काढतात. आता फोटो घेणाऱ्याला फोटो घ्यायचा असतो आणि आपल्याला द्यायचा असतो. त्याचा आग्रह आपल्याला टाळता येत नाही. पण वैयक्तिक जीवनात तो काय करतो याचा संबंध आमच्याशी येतच नाही. अशा घाणेरड्या प्रवृत्तींना, खून करणाऱ्या लोकांना आम्ही मदत करतोय, पाठबळ देतोय किंवा पाठीशी घालतोय असं कधी आम्हाला जमलं नाही. इतक्या वर्षांपासून आम्ही राजकारणात, समाजकारणात आहेत असं कधी केलं नाही”.

विरोधकांकडून आरोप होत आहे की आरोपींना राजकीय आश्रय मिळतोय, या मुद्द्यावर विचारले असता धनंजय मुंडे म्हणाले की, “कारवाई पहिल्याच दिवशी झाली. पहिल्या दिवशीच चार आरोपी अटक झाले, बाकीच्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीसांनी आठ वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत, त्यांनाही लवकर अटक केली जाईल”.

हेही वाचा>> “सिगरेटच्या लायटरनं त्याचे डोळे जाळले, मृतदेहावर उड्या मारल्या”, विरोधी पक्षांकडून बी…

या प्रकरणात खंडणी उकळणारी टोळी होती असे बोलले जात आहे, याबद्दल विचारले असता मुळात खंडणीचा मुद्दा यामध्ये आला कसा हा एक प्रश्न आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले. मुख्यमंत्र्‍यांनी स्वतः निवेदन करतो असं म्हटल्यानंतर सभागृहाबाहेर त्यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्‍याने बोलणे हा सभागृहाचा अपमान वाटू शकतो असेही धनंजय मुंडे म्हणाले.

वाल्मीक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानदेखील हालत नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलें होतं, याबद्दल विचारले असता धनंजय मुंडे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीपासून ते महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यापासून माझी आणि पंकजा मुडे यांची खाली काम करणाऱ्या टीममध्ये असंख्य लोक आहेत. त्यांच्यापैकी एक वाल्मीक कराड देखील आहेत असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.