विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनास आज सुरुवात झाली. फडणवीस आणि शिंदे सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीने अधिवेशनाची सुरुवात झाली. भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांना बहुमतापेक्षा अधिक मते मिळाल्यामुळे त्यांची विधानसभा अध्यपदी निवड करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे नार्वेकरांचा अभिनंदन प्रस्ताव वाचत होते तेव्हा यांच्याकडून अनावधानाने राहुल नार्वेकर यांच्या ऐवजी अध्यक्ष म्हणून शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख झाला आणि सभागृहात एकच हशा पिकला.
शिवसेनेला टोला
धनंजय मुंडे यांच्याकडून राहुल नार्वेकरांच्या ऐवजी मिंलिद नार्वेकरांचे अध्यक्ष म्हणून नाव घेताच सभागृह सदस्यांनी त्यांना थांबवले. त्यानंतर सुनील प्रभू यांनी ही चूक रेकॉर्डवरून काढण्यात आल्याची सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचे अभिनंदन करण्यासाठी धनंजय मुंडे फडणवीसांकडे गेले होते. त्यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरही तिथे आले होते अस मला कळालं. त्यामुळे माझा अध्यक्षांचे नाव घेताना गोंधळा झाला असल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले. फडणवीसांचे अभिनंदन करण्यासाठी कुणी समोरच्या दाराने आले तर कोणी मागच्या दाराने आले अस म्हणत मुडेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
प्रत्येक विधियकावर चर्चा व्हावी
प्रत्येक विधायकावर चर्चा व्हावी. कोणतेही विधायक चर्चेविना पारित करू नये, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. तसेच चर्चा करण्यासाठी सदस्यांना वेळ द्यावा, अशी मागणही मुंडेनी केली आहे.