पुतणे अजित पवार यांच्या भेटीमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाच्या चर्चेला शरद पवार यांनी १७ ऑगस्ट रोजी बीडमधल्या सभेत केलेल्या भाषणातून पूर्णविराम दिला. पवार यांनी बीडच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्वपक्षातील बंडखोर नेत्यांना लक्ष्य केलं. ‘‘भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव करून तुम्ही निवडून आलात आणि नंतर भाजपाच्या दावणीला बांधले गेलात’’, अशी टीका शरद पवार यांनी बंडखोरांवर केली. दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. ही सभा शरद पवार यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी घेतली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीडमध्ये २७ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या सभेबद्दल बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, १७ तारखेला बीडमध्ये झालेली सभा कशासाठी होती हे मला अजून समजलंच नाही. परंतु, आपली २७ तारखेची (२७ ऑगस्ट) सभा ही काही त्या सभेला उत्तर देण्यासाठी नाही. ही सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची आणि सन्मानाची असेल.

धनंजय मुंडे म्हणाले, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही तर चार वेळा अजित पवार यांच्यासहित सगळे मान्यवर नेते शरद पवारांचा आशीर्वाद घ्यायला गेले. त्यात काय चुकलं? आपल्या देवाचा आशीर्वाद घेतला त्यात आमचं काय चुकलं? आजही आम्ही तेच करतोय. म्हणून आपली सभा म्हणजे त्या सभेला उत्तर नाही. त्या सभेत कोण काय बोललं याला उत्तर नाही. त्यांना उत्तर द्यायचं आहे. त्यांना येणाऱ्या निवडणुकीत उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहोत.

हे ही वाचा >> “मला खात्री आहे…”, अजित पवारांबरोबर गेलेल्या नेत्यांबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य

बीडच्या सभेत शरद पवार काय म्हणाले होते?

बीडमधील सभेत शरद पवार बंडखोर नेत्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचं असेल तर जा, पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी दाखवा. अन्यथा लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत’’

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde reply to sharad pawar beed rally says will answer in upcoming election asc
Show comments