गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार देऊ नये, असा आपण आग्रह धरल्यानंतर पक्षाने तो मान्य केला. मात्र, सहानुभूतीच्या लाटेत विकासाचा मुद्दा बाजूला गेला आणि परळी विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला. त्यामुळे नतिक जबाबदारी स्वीकारून विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे देण्याची घोषणा आमदार धनंजय मुंडे यांनी केली.
परळीत राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे व भाजपच्या पंकजा मुंडे या बहिण-भावात लढत झाली. यात धनंजय मुंडे यांचा २६ हजारांच्या मताधिक्क्याने पराभव झाला. या पाश्र्वभूमीवर धनंजय यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांची बठक घेऊन पराभवावर आत्मचिंतन केले. वीस वष्रे परळीतील सर्वसामान्य जनतेचे  प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ३ वर्षांत गावा-गावापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी निधी खेचून आणला. मात्र, पहिल्यांदाच स्वतसाठी मत मागितल्यावरही पराभव झाला. जनतेचा कौल आपणास मान्य आहे. मात्र, पराभवाने खचून न जाता काम करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने उमेदवार देऊ नये, या साठी आपण पक्षाकडे आग्रह धरला, त्यांनी तो मान्य केला. परळीतही सहानुभूतीच्या लाटेपुढे विकासकामांचा मुद्दा टिकू शकला नाही. त्यामुळे पराभवाची नतिक जबाबदारी स्वीकारत विधान परिषद सदस्यत्वाचा पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी जाहीर केले. दिवाळीनिमित्त बारामती येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यास मुंडे रवाना झाले.

Story img Loader