वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शने केली आहेत. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापलं असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी नवीन सरकारमधील नाराजीनाट्यबाबत मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२० जून रोजी महाराष्ट्र विधान परिषदेसाठी मतदान संपल्यानंतर काही आमदार सुरतेकडे गेले. त्यानंतर आणखी काही आमदार पुन्हा सुरतला गेलो. तेथून ते गुवाहाटी, गोवा आणि मुंबई असा प्रवास केला. यासाठी त्यांचे २५ दिवस गेले. २७ दिवसानंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले. अनेक दिवस दोघांनीच सरकार चालवल्यानंतर ४२ दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार झाला. पण अजून महाराष्ट्राला पालकमंत्री मिळाले नाहीत.

हेही वाचा- “वेदान्त कंपनीकडे किती टक्के मागितले? १०% हिशोब की…”; आशिष शेलारांचा सवाल

त्यामुळे यावर्षी १५ ऑगस्ट रोजी कोणत्याही मंत्र्यांनी जिल्ह्यात जाऊन तिरंगा फडकवला नाही. जिल्हाधिकारीच तिरंगा फडकवत आहेत. मंत्रीमंळ विस्तार होऊन किती झाले तरीही त्यांना अजून पालकमंत्री निवडता आले नाहीत. कारण नवीन सरकारमधील काही मंत्री नाराज आहेत म्हणून त्यांनी अद्याप मंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली नाहीत. त्यांना जो विभाग मिळाला आहे, म्हणून नाराज झाले आहेत, असं हे अजब सरकार आहे. मंत्री करायला जर दोन महिन्यांचा काळ गेला असेल आणि अद्याप पालकमंत्री मिळाले नसतील तर तुमचा-आमचा विकास येणाऱ्या किती दिवसात होईल याचा हिशोब लावा. शुन्याची ज्यांनी निर्मिती केली त्यांनाही हिशोब लावता येणार नाही, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला आहे.

हेही वाचा- “हे सरकार केवळ अजित पवारांना घाबरतं” बीडमधील मेळाव्यात धनंजय मुंडेची तुफान फटकेबाजी!

एखाद्या राज्यात सत्तांतर का होतं? जनतेचे प्रश्न सुटत नव्हते का? जनतेला महाविकास आघाडी सरकारची फार मोठी अडचण झाली होती, म्हणून हे नवीन सरकार आलंय का? असं काहीही झालं नाही. ज्यांनी सरकार स्थापन केलंय, त्यांनाही कळेना, जे मंत्री झाले आहे, त्यांनाही कळेना की नवीन सरकार अस्तित्वात का आलंय. जे मंत्री सुरतेकडे गेले, ते परत आल्यावर त्यांना कळालं, आता आपलं मंत्रीपदही गेलं आहे, ते आता मोकळं फिरत आहेत, अशी बोचरी टीका धनंजय मुंडेंनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde speech in ncp melava beed why minister not taken charge rmm