आजची भारताच्या सैन्यक्षमतेची केवळ झलक आहे. या ट्रेलरनंतर पिक्चर कधी रिलीज करायचा हे सैन्याचं नेतृत्व योग्यवेळी ठरवेल अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भारतीय सैन्याच्या कामगिरीचे कौतुक करत अभिनंदन केले. भारतीय वायुदलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवादयांच्या अड्ड्यावर केलेल्या धाडसी कारवाईबद्दल सभागृहात भारतीय वायुदलाचे अभिनंदन केले. आज वायुदलाच्या जवानांचा अभिनंदन करण्याचा ठराव आहे त्याला माझा पाठिंबा आहे असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश दु:खात होता. परंतु असे असताना संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी उभा राहिला होता. कोणतेही राजकारण न करता सर्व भारतीय जनता आणि सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे राहिले असल्याचेही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.

आज भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला. त्यामध्ये जवळजवळ 300 दहशतवादयांचा खात्मा केला आणि आपली सर्व विमाने सुखरूप परत आली. यामध्ये जैश ए मोहम्मद, हिजाबुल मुझाहिद्दीन, लष्करे ए तोयबा अशा अनेक अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडलं असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. यापुढे देखील देशाच्या सार्वभौमतेच्या रक्षणासाठी यापुढेही आपण सगळेजण भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी तनमनाने भक्कमपणे उभे राहिले पाहिजे असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.