मुंबई : धनगर आरक्षणासंदर्भात नेमलेल्या ‘सुधाकर शिंदे समिती’ने सात राज्यांतील आरक्षण प्रक्रियेचा अभ्यास अहवाल राज्य शासनाला सोमवारी सुपूर्द केला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे. दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जारी झालेली ‘धनगड’ प्रमाणपत्रे आदिवासी विभागाच्या जात पडताळणी समितीने रद्द केली आहेत. या पार्श्वभूमीवर सकल धनगर समाजाचे शेकडो कार्यकर्ते उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या ठिकाणी आदिवासी आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार आहेत.

भारतीय महसूल सेवेतील अधिकारी सुधाकर शिंदे यांनी ‘इतर मागास बहुजन कल्याण विभागा’च्या सचिव वनिता वेद सिंघल यांच्याकडे अभ्यास अहवाल सादर केला. अनुसूचित यादीत समावेश नसलेल्या जातींना अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे किंवा इतर लाभ देताना इतर राज्यांनी कोणती प्रकिया अवलंबली याचा अभ्यास या अहवालात आहे. महायुती सरकारने सप्टेंबरमध्ये त्यासंदर्भात शिंदे समिती नेमली होती. समितीने सात राज्यांचे दौरा करून अभ्यास अहवाल तयार केला आहे. समितीमधील काही सदस्यांनी पूर्वीच वैयक्तिक अहवाल शासनाला सुपूर्द केले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात खिल्लारे कुटुंबातील सहा सदस्यांनी धनगड जमातीची प्रमाणपत्रे मिळवली होती. ही प्रमाणपत्रे बोगस असून ती रद्द करावीत, अशी धनगर समाजाच्या आंदोलकांची मागणी होती. मात्र जात पडताळणी समितीला जात प्रमाणपत्रे रद्द करण्याचे अधिकार नसतात. अखेर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तसे अधिकार देण्यात आले आणि आज धनगड प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. धनगड जमातीची प्रमाणपत्रे काहींनी मिळवल्याने उच्च न्यायालयात आदिवासी आरक्षणासंदर्भातल्या खटल्यात पराभव झाला, असा धनगर आंदोलकांचा आरोप आहे.

present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा

हेही वाचा : अभिनेत्री सुहास जोशी यांना विष्णुदास भावे गौरवपदक

राज्यात आंदोलन सुरू

आदिवासी आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाजाचे राज्यात २२ दिवस आंदोलन सुरू आहे. शिंदे समितीचा अहवाल आणि धनगड प्रमाणपत्रे रद्द झाल्यामुळे आम्हाला आदिवासी आरक्षण मिळण्यातील अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे आता महायुती सरकारने उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा शासन निर्णय घ्यावा, अशी सकल धनगर समाजाच्या आंदोलनाचे समन्वयक बिरु कोळेकर यांनी मागणी केली आहे.

उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या ठिकाणी सकल धनगर समजाचे शेकडो कार्यकर्ते नवी मुंबईतून पदयात्रा करत महायुती सरकारवर दबाव वाढवण्यासाठी धडकणार आहेत.

हेही वाचा : Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांचं राज ठाकरेंना उत्तर, “मी आदिवासी आहे जाळी नसली तरीही…”

आदिवासी आमदारांचा इशारा

शासन निर्णय काढून धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देऊ, असे लिखित आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ दिवसांपूर्वी दिले होते. त्याची पूर्तता आचारसंहिता लागण्यापूर्वी करावी, अशी धनगर समाजाची मागणी आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या दृष्टीने महायुती सरकारने पावले टाकली आहेत. यामुळेच आदिवासी समाजात त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. महायुती सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा निर्णय घेतल्यास त्याची किंमत महायुतीला चुकवावी लागेल, असा इशारा आदिवासी आमदारांनी दिला आहे.