वाई: धनगर व धनगड असा शब्दछल करत शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला. यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा पहिला फटका बारामतीला बसणार असल्याची टीका धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

धनगर आरक्षणासाठीच्या ‘धनगर जागर’यात्रे निमित्त लोणंद (ता खंडाळा) येथील जाहीर सभेत आमदार पडळकर बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके-पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे-पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर

आणखी वाचा-“मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं, सर्वांची नावं सांगणार”, ललित पाटीलच्या वक्तव्यावर मुंबई पोलीस म्हणाले…

आमदार पडळकर म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण मिळाले, तर त्याचा पहिला फटका बारामतीला बसणार आहे. म्हणूनच शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला. धनगर समाजात ऊर्जा यावी, त्यांच्यातील भीती दूर व्हावी, यासाठी कशाचीही पर्वा न करता कोणालाही जाऊन भिडतो आहे. तरीही भीती जाणार नसेल तर साहेब, ताई, दादा, आबांचे खूळ डोक्यातून काढा. ही गुलाम बनवणारी यंत्रणा आहे. या पदांना प्रथम मूठमाती द्या, तरच तुम्हाला राजे होता येईल.

आणखी वाचा-उद्धव ठाकरे आणि नितीन राऊत यांचे फोटो असलेले बॅनर हटवा; कोणी केली अशी मागणी, काय आहे प्रकरण?

गट, तट, पक्ष विसरून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात सर्वांनी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन पडळकर यांनी केले. धनगर समाजाला आरक्षण मिळाले, तर त्याचा पहिला फटका बारामतीला बसणार आहे. म्हणूनच शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला. धनगर व धनगड असा शब्दछल करत खो घालण्याचे काम केले. आरेवाडी येथे (दि २२) होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही या वेळी त्यांनी केले.