Dhangar Reservation CM Eknath Shinde vs Narhari Zirwal : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार व आदिवासींचे नेते नरहरी झिरवाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “धनगरांचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. याबाबतचा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींना त्या बैठकीला बोलवायला हवं होतं. आम्ही तिथे आमचे विचार मांडले असते. परंतु, आम्हाला विश्वासात न घेतल्यामुळे आगामी काळात राज्यात मोठा संशयकल्लोळ निर्माण होऊ सकतो.

नरहरी झिरवाळ म्हणाले, “आमच्या आरक्षणातच प्रत्येकाला आरक्षण हवं आहे. परंतु, हा हट्ट काही कामाचा नाही असं मला वाटतं. मध्यंतरी यासंदर्भात शिंदे समिती नेमली होती. त्यांनी आरक्षणाचा अभ्यास केला व नंतर ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. परंतु, त्यावर तेव्हा निर्णय झाला नव्हता. आता पुन्हा एकदा धनगर समाजाचा आदिवासींच्या आरक्षणात समावेश करण्याबाबत विचार चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात समिती नेमली आहे. परंतु, माझी राज्य शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की यासंदर्भातील निर्णय घेताना तुम्ही जसं त्यांना (धनगरांच्या नेत्यांना) बोलावलं होतं, त्याचप्रमाणे आमच्याशी देखील चर्चा करायला हवी होती”.

yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
devotees crowd in pandharpur due to christmas holidays
नाताळ सुटीमुळे पंढरपूरला भाविकांची गर्दी
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
MLA sameer kunawar reaction on not getting place in cabinate minister
वर्धा : कोण म्हणतो मी नाराज! ‘हे’ आमदार म्हणतात, ‘मंत्री पदाची इच्छा…’
devendra fadnavis ajit pawar nana patole
Video: भाषण मध्येच थांबवून फडणवीस अजित पवारांना म्हणाले, “दादा तुम्ही नक्की एक दिवस…”!

हे ही वाचा >> Maharashtra Breaking News Live : “मोदी-शहांच्या इशाऱ्यानंतर निवडणुका होतील”, मुख्यमंत्री शिंदेंच्या दाव्यावरून राऊतांचा टोला

झिरवाळ म्हणाले, “जर आमचे त्यांच्याशी लागेबंधे आहेत तर आम्हालाही त्या बैठकीला बोलवायला पाहिजे होतं. म्हणून मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढच्या आठवड्यात भेटणार आहे. आमच्या संघटना, आमच्या समाजासाठी आयुष्य खर्च केलेल्या लोकांना घेऊन आमच्या समाजाचा विचार मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचा माझा प्रयत्न राहील”.

हे ही वाचा >> Nitin Gadkari : “योग्यता नसताना जेव्हा मुलांसाठी तिकीटं मागितली जातात, तेव्हा…”, घराणेशाहीच्या राजकारणावर नितीन गडकरींचं परखड मत

मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही विश्वासात घ्यायला हवं होतं : झिरवाळ

दरम्यान, यावेळी नरहरी शिरवळ यांना विचारण्यात आलं की मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर तुम्ही नाराज आहात का? त्यावर झिरवाळ म्हणाले, मला असं वाटतं की आम्हाला त्या बैठकीला बोलवायला हवं होतं. आमच्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना तरी बोलावलं असतं तर त्यांनी आमचे विचार, आमच्या मागण्या, आमचं म्हणणं तिथे मांडलं असतं. त्यांनी समिती नेमण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या समितीत आमच्या लोकांना देखील समाविष्ट केलं असतं, किंबहुना आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे होतं, असं मला वाटतं. असं न केल्याने आगामी काळात संशयाचा एक मोठा कल्लोळ निर्माण होईल असं मला वाटतं

Story img Loader