राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील आमदारांचा मोठा गट घेऊन अजित पवार महायुतीत सहभागी झाले आहेत. अजित पवार हे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहू लागले आहेत. परंतु आता ते लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने केला जात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यापासून ते अजित पवारांच्या गाटातील आमदारांपर्यंत अनेकांनी असा दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांचा ६४ वा वाढदिवस होता. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या चौकांमध्ये होर्डिंग्स लावले होते. या होर्डिंग्सवर अजित पवारांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा केला होता.

दरम्यान, अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील दोन दिवसांपूर्वी एक सूचक ट्वीट केलं होतं. “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व…”, अशा कॅप्शनसह मिटकरी यांनी अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तेव्हा आई देवाचा जप करत बसली होती”, अजित पवारांनी सांगितला विधानसभेच्या निकालाच्या दिवशीचा किस्सा
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
Pratap Sarangi and Mukesh Rajput
BJP MP Pratap Sarangi : राहुल गांधींनी ‘धक्का’ दिल्याचा आरोप करणारे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत कोण आहेत? जाणून घ्या!
Ajit Pawar, Nationalist congress Party, Hedgewar Smruti Mandir reshimbagh,
संघाविषयीच्या भूमिकेवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, दोन आमदार संघस्थळी
Narhari Zirwal On Chhagan Bhujbal
Narhari Zirwal : “छगन भुजबळांसाठी पुढे मोठा विचार होणार असेल म्हणून…”, अजित पवार गटाच्या नेत्यांचं सूचक विधान
Dilip Walse Patil
Dilip Walse Patil : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहात का? दिलीप वळसे पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; भुजबळांबाबतही केलं मोठं भाष्य

दरम्यान, या सगळ्या राजकीय चर्चांवर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी भाष्य केलं आहे. अत्राम यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. मंत्री अत्राम यावेळी म्हणाले, आधीच्या सरकारच्या काळात आमदारांच्या निधीचं काम सुरू होतं. मोठी अडचण नव्हती, परंतु काही स्थगित्या होत्या. आता सगळं सुरळीत झालंय. आताची परिस्थिती वेगळी आहे. कारण आता राज्यात राजकीय परिवर्तन झालं आहे. निधी येतोय, त्यामुळे विकासकामं होत आहेत.

हे ही वाचा >> “देशासमोर मणिपूरचं सत्य…”, लोकसभेत अमित शाह यांनी विरोधकांना काय सांगितलं?

दरम्यान, अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचे जे राजकीय दावे केले जात आहेत, त्यावर प्रश्न विचारल्यावर धर्मरावबाब अत्राम म्हणाले, आता ते होईल तेव्हा होईल. ऑगस्ट महिन्यात काही परिवर्तन घडेल का? असा प्रश्न विचारल्यावर, धर्मरावबाबा अत्राम म्हणाले, तसं झालं तर चांगलंच आहे. परंतु सध्या जे सरकार अस्तित्वात आहे ते चांगलं आहे. भविष्यात काही घडामोडी घडतील की नाही, ते सांगू शकत नाही.

Story img Loader