धाराशिव : विशाखापट्टनम येथून सीमावर्ती उमरग्याहून सोलापूरकडे जात असलेला सव्वापाचशे किलो गांजा पोलिसांनी पकडला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि नळदुर्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सोलापूर येथील एका आरोपीसह एक कोटी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विशाखापट्टनम येथून चोरीच्या मार्गे गांजाची वाहतूक केली जात होती. एक स्कॉर्पिओ गाडी आणि एक कार यासह सहाजण गांजा घेवून जिल्ह्यात दाखल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि नळदुर्ग पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गवर स्कॉर्पिओ गाडी अडविली. गाडी थांबल्यानंतर गाडीची तपासणी करण्यात आली. गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. यावेळी अतिष राजकुमार माने याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हा गांजा सोलापूरला घेऊन जात असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, यामध्ये भीमराव दिलीप खडसुळे, राम दिलीप खडसुळे, डी. जे. चहाविक्रेता, कळवे, रवी (सर्व रा. सोलापूर) व राहुल (रा. अहमदनगर) या नावाच्या आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे त्याने सांगितले. या सर्व आरोपींवर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील अतिष राजकुमार माने याला अटक करण्यात आली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – Pooja Khedkar Anticipatory bail: UPSC चे पूजा खेडकर यांच्यावर नेमके आक्षेप तरी काय? कोर्टात केला सविस्तर युक्तिवाद; म्हणाले, “अत्यंत हुशारीने हे…”

हेही वाचा – Maratha Reservation : “…तर तुमचा पक्ष गुंडाळून टाका”, प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना सल्ला; उद्धव ठाकरेंनाही सुनावलं

स्कार्पिओ गाडीतून पोलिसांनी एकूण ५२८ किलो गांजा जप्त केला आहे. त्याची किंमत एक कोटी पाच लाख ७८ हजार ८०० रुपये इतकी आहे. गांजा व स्कॉर्पिओ गाडी, असा एकूण एक कोटी १५ लाख ७८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अलीकडच्या काळात राष्ट्रीय महामार्गावर इतक्या मोठ्या किंमतीचा गांजा पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांगुने हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसर, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे व त्यांची टीम तसेच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांगुने, सुरज देवकर आटुळे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे, गिते आदींनी केली.

Story img Loader