जालना जिल्ह्यात पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ धाराशिव शहरासह जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील शम्स चौक आणि नगर पालिका परिसरात काही तरुणांनी दगडफेक केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी त्यावर तात्काळ नियंत्रण मिळविले. शहरातील मुख्य रस्त्यांवरून ‘एक मराठा लाख मराठा’ आशा घोषणा देत तरुणांचे घोळके शहर बंद करण्याचे आवाहन करीत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात मोठा फौजफाटा तैनात केला होता.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला त्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यांतील अनेक गावांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला आहे. कळंब आणि उमरगा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पाळून जालना येथील घटनेचा निषेध नोंदवला. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व बसगाड्या बंद ठेवल्या होत्या. अचानक बसगाड्या बंद ठेवल्यामुळे प्रवाश्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. जिल्ह्यातील जवळपास सर्वच बस स्थानकात कडकडीत बंद स्पष्टपणे दिसून आला. उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने उमरगा शहर व तालुक्यातील विविध गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.
हेही वाचा >>>Jalna Lathi Charge: जालन्यात लाठीमाराचा आदेश कोणी दिला; रोहित पवार यांचा प्रश्न
पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे बंद दरम्यान अनुचित प्रकार घडला नाही. रात्री उशिरापासूनच उमरगा बंदचे आवाहन समाजमाध्यमातून करण्यात आले होते. व्यापारी महासंघाने बंदला पाठिंबा दिल्याने व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली होती. तहसीलदार गोविंद येरमे यांना निवेदनात देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब पवार, बाळासाहेब माने, सुधीर माने, चंद्रशेखर पवार, विनोद कोराळे, संजय पवार, दत्ता शिंदे, लक्ष्मण शिंदे, मंगेश भोसले, वसंत माने, शाहुराज माने, किशोर शिंदे, विजयकुमार नागणे, योगेश तपसाळे, सचीन जाधव, शरद पवार, अमर शिंदे, विशाल माने, प्रदिप भोसले, बालाजी वडजे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, प्रा. डॉ. शौकत पटेल आदींची यावेळी उपस्थिती होती.
हेही वाचा >>>Jalna Lathi Charge : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळेच…”, शरद पवार यांचा आरोप
परंडा सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार घनश्याम आडसूळ यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवारही उपस्थित होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व लाठीचार्ज घटनेचा व राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच आरक्षणाची जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली. विविध राजकीय पक्ष, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ परंडा शहर व तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यावेळी समाधान खुळे, डॉ प्रशांत मांजरे, मनोज कोळगे, राहुल बनसोडे, संदीप पाटील, भाऊसाहेब खरसडे, देवानंद टकले, जमील पठाण, आझर शेख, निशिकांत श्रीरसागर, शशिकांत जाधव, राजकुमार देशमुख, नसीर शहाबर्फीवाले, जावेद पठाण, सलीम हन्नुरे, संजयकुमार बनसोडे, तानाजी बनसोडे यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः उतरले रस्त्यावर
जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बंदच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीपासूनच पूर्वतयारी सुरू केली होती. नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करून कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये यासाठी शहर आणि जिल्ह्यात तगडा बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनाला राजकीय रंग येऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर होते.