धाराशिव – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये प्रमुख लढत आहे. प्रमुख लढतीचे चित्र जरी स्पष्ट झाले असले तरी वंचितचे कुकर, एमआयएमचा पतंग आणि बीएसपीचा हत्ती निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेला आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी वगळता २९ इतर उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे यंदा मतविभागणी पूर्वीच्या तुलनेत वाढणार, असा अंदाज आहे. आजवर झालेल्या १७ लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत सर्वाधिक उमेदवार यंदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे या मतविभागणीचा लाभ कोणाला होणार आणि कोणाची बत्ती गुल होणार हे जूननंतर स्पष्ट होईल.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा २००९ पूर्वी अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. २००९ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली. जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ कमी झाला आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड या दोघांनी एकमेकांना आव्हान दिले. डॉ. पद्मसिंह पाटील यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक. या निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांना कौल दिला. केंद्रात सत्तेत असलेल्या आघाडीच्या बाजूने मतदार झुकले आणि रवींद्र गायकवाड यांचा पराभव झाला. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत एकूण २५ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार वगळता त्यावेळी हत्ती चिन्हावर निवडणूक लढविणार्‍या बीएसपीच्या उमेदवाराला २८ हजार मते मिळाली होती आणि एकूण मतांची विभागणी एक लाख १३ हजार ६५४ एवढी होती. मतदारसंघ खुला झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत २५ उमेदवार रिंगणात उतरले आणि प्रमुख प्रतिस्पर्धी वगळता २३ उमेदवारांमध्ये एक लाखाहून मतदान विभागले गेले.

Ahmednagar mahavikas aghadi
नगरमध्ये महाविकास आघाडीत तीन जागांचा तिढा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
mahavikas aghadi alibag
महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांचा अलिबागच्या जागेवर दावा
possibility of a rift in the Mahavikas Aghadi over the Gondia Assembly Constituency
पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद अन् दोघेही बाशिंग बांधून तयार, पण सुमंगल कोणाचे? गोंदियावरून आघाडीत तिढा!
Palghar, Palghar politics, political party Palghar,
पालघर जिल्ह्यात पक्षांतर केलेल्यांचा जीव टांगणीला
Chances of Rebellion in the mahayuti and a three-way fight again in chinchwad
चिंचवडमध्ये महायुतीत बंडखोरी?
Pimpri-Chinchwad, Mahayuti, NCP Ajit Pawar group,
पिंपरी- चिंचवडमध्ये महायुतीत धुसफूस; राष्ट्रवादीचा सर्व मतदारसंघांवर दावा
Jammu and Kashmir Assembly Elections 2024
काश्मीर बदल रहा है! शून्य मतदान होणाऱ्या गावात यंदा प्रचंड मतदान

हेही वाचा – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?

देशात मोदींच्या नावाचा गाजावाजा सुरू झाला आणि मोदींच्या नेतृत्वाखालीच २०१४ सालची लोकसभा निवडणूक भाजपाने लढवली. देशात ज्या पद्धतीचे राजकीय वारे वाहत होते. त्याचा प्रभाव उस्मानाबाद जिल्ह्यातही पडला. पुन्हा एकदा तत्कालीन खासदार डॉ. पद्मसिंह पाटील आणि प्रा. रवींद्र गायकवाड एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले. या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान यंत्रावर नोटा हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आलेल्या या पर्यायाचा चार हजार ६१३ मतदारांनी फायदा घेतला आणि मतपत्रिकेवरील एकही उमेदवार आम्हाला पसंत नाही, हे अधोरेखित केले. या निवडणुकीत युती आणि आघाडीचे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार वगळता २६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यात बहुजन समाज पार्टीच्या हत्तीसह इतर अनेक अपक्ष उमेदवारांचा समावेश होता.

सन २००९ च्या निवडणुकीत मिळालेला मतांचा आलेख तसाच पुढे ठेवत बीएसपीने २८ हजार ३२२ मते मिळविली. प्रमुख प्रतिस्पर्धी वगळता उर्वरित २६ उमेदवारांमध्ये एक लाख २५ हजार २२० मतदार विभागले गेले. २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत मतांची विभागणी लाखाचा टप्पा पार करून गेली. २००९ प्रमाणेच २०१४ साली धाराशिव जिल्ह्यातील मतदारांनी सत्तेसोबत जाणार्‍या उमेदवाराला हिरवा झेंडा दाखविला आणि प्रा. रवींद्र गायकवाड धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले.

मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पहिल्या दोन्ही निवडणुकीत अनुक्रमे २५ आणि २८ अशी उमेदवार संख्या होती. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या घटली. या निवडणुकीत १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या १५ पैकी ११ उमेदवारांना दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. या अकरा उमेदवारांपैकी नोटा या पर्यायाला सर्वाधिक मतदान झाले. एकूण मतदानाच्या ०.८३ टक्के मतदान या निवडणुकीत मतदारांनी नोटा या पर्यायाला केले. १० हजार २४ मतदारांनी नोटाचे बटन दाबत मतदान यंत्रावरील एकही उमेदवार आम्हाला मान्य नसल्याचे अधिकृतपणे नमुद केले. या निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे होते. मोदींचा झंझावात, देशात युतीला असलेले पुरक वातावरण आणि केंद्रात कोणाची सत्ता येईल, याचा अंदाज घेवून सत्तेसोबत जाणार्‍या उमेदवाराला पुन्हा एकदा मतदारांनी निवडून दिले. धनुष्यबाण चिन्हावर ओमराजे विजयी झाले. प्रमुख दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार वगळता उरलेल्या १३ उमेदवारांमध्ये एक लाख ३९ हजार मतांची विभागणी झाली. एकट्या वंचितने ९८ हजार ५०० मते काबीज केली आणि एक लाख २७ हजार मतांनी घड्याळ चिन्हावर उभे असलेले राणाजगजितसिंह पाटील पराभूत झाले.

हेही वाचा – “..तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकांची ठरली असती”; पृथ्वीराज चव्हाणांचे पंतप्रधानांवर टीकास्र

आता होऊ घातलेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अपक्षाची तुतारी, एमआयएमचा पतंग, वंचितचे कुकर आणि बीएसपीचा हत्तीही उमेदवारीच्या रिंगणात प्राधान्याने दिसत आहे. उमेदवारांची वाढलेली संख्या मागील तिन्ही निवडणुकांपेक्षा अधिक मतविभागणी करेल, असे जाणकारांचे मत आहे. तिन्ही निवडणुकीत केंद्रात कोणाची सत्ता येणार याचा कानोसा घेत मतदारांनी सत्तेसोबत जाणारा उमेदवार निवडून दिला आणि विरोधी उमेदवाराला मतविभागणीचा फटका बसला. या निवडणुकीतही त्याच बाबींची पुनर्रावृत्ती होणार का? मतविभागणीचा फटका कोणाला बसणार? आणि कोणाचा विजय होणार? हे ४ जूननंतर स्पष्ट होईल.