धुळे तालुक्यातील अंबोडे शिवारत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळून आला. यानंतर पोलिसांना चौकशी करत मृताची ओळख पटवण्यात यश आलं. मृताचे नाव ज्ञानेश्वर रामभाऊ राठोड (वय २५, रा. रणाईचे तांडा ता. अमळनेर, जि.जळगाव) असे निष्पन्न झाले. मृताच्या पोटावर, पाठीवर, तोंडावर तीक्ष्ण हत्याराचे वार करण्यात आले होते. त्यावरून अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा धुळे पोलिसांनी २४ तासात छडा लावला.

या गुन्ह्याचे तपासात धुळे तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपीचा शोध घेतला. तपासात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपी मृताचा पुतण्या जगदीश बबलु राठोड (रा. रणाईचे तांडा, ता. अंमळेनर, जि. जळगाव) याची सखोल चौकशी करण्यात आली. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
6 arrested for 40 lakh medical college admission scam
वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक; हडपसर पोलिसांकडून सहा जणांविरुद्ध गुन्हा
shreya talpade and aloknath fir
अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणुकीच्या प्रकरणात आले नाव; काय आहे प्रकरण?
young man kills grandmother for greed for money in raigad
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला
Greeshma Poisoning Case Verdict
Greeshma Poisoning Case Verdict: विष देऊन बॉयफ्रेंडला मारलं; न्यायालयानं गर्लफ्रेंडला सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा, मन सुन्न करणारी क्राइम स्टोरी

पोटावर, पाठीवर, मानेवर चाकूने वार करून खून

अनैतिक संबंधाच्या कारणावरून आरोपीने पीडित ज्ञानेश्वर राठोड याला रणाईचा तांडा येथून मोटार सायकलवरुन अंबोडे शिवारातील निर्जनस्थळी आणलं. या ठिकाणी आरोपीने पीडित ज्ञानेश्वर राठोडच्या पोटावर, पाठीवर, मानेवर चाकूने वार करून खून केला, असे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यावरून आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला धुळे तालुका पोलिसांनी २४ तासात ताब्यात घेतले.

हेही वाचा : पुण्यात दरोडेखोरांचा पोलिसांवर चाकू हल्ला; वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी रोखलं पिस्तूल अन्…

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस उप निरीक्षक अनिल महाजन, सागर काळे, सुनिल विंचुरकर, प्रविण पाटील यांच्या पथकाने केली.

Story img Loader