शिवसेना(ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर पुन्हा एकादा टीका केली आहे. एकनाथ शिंदेंना ठाण्याबाहेर कोणी ओळखत तरी होतं का? असं ते म्हणाले आहेत. याशिवाय, शिवसेनेची मुळं मजबुत आहेत, पालापाचोळा इकडेतिकडे गेल्याने फरकत पडत नाही, असंही सावंत यांनी बोलून दाखवलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून मोर्चाबांधणी सुरू झाली आहे. काही नियुक्ता जाहीर करण्यात येत आहेत, मुंबई महापालिकेच्या कामाचं ब्रॅण्डिंगही मुख्यमंत्री शिंदेकडून केलं जात असल्याचं दिसत आहे. यावर टीव्ही 9 ला प्रतिक्रिया देताना खासदार अरविंद शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे.
अरविंद सावंत म्हणाले, “काही फरक पडत नाही. ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर त्यांना कोणी विचारेणा मुख्यमंत्री आहेत म्हणून तुम्ही नाव घेताय सगळीकडे. तुम्ही कधीतरी आठवण सांगा की मुंबई शहरातील कुठल्याही एखाद्या वॉर्डमध्ये यांना कधी बोलावलं होतं का? भरकटवणं, भटकवणं हे त्यांचे मुद्दे आहेत.”
याशिवाय सत्तासंघर्ष आणि धनुष्यबाण निशाणी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून यावर निकाल येणार आहे, याबाबत बोलताना अरविंद सावंत यांनी, “धनुष्य बाण येईलच काळजी नका करू. निवडणूक आयोगाने २३ नोव्हेंबर तारीख दिली होती, मग ती पुढे का ढकलली, कोणासाठी ढकलली? आणि विशेष म्हणजे यापुढे तारीख वाढवून देणार नाही असं बजावलेलं होतं. मग ती तारीख कोणासाठी वाढवली. त्यांना कळलं की शिवसेनेचे २० लाखांच्या वर सभासद नोंदणीचे फॉर्म गेले आहेत. अजुनही गावागावांमध्ये लोक सभासद नोंदणीचे फॉर्म मागत आहेत. ही परिस्थिती पाहिल्यानंतर लक्षात येतं, की शिवसेनेची मुळं मजबुत आहेत. इकडं तिकडं पालापाचोळा गेला तर काही फरकत पडत नाही.” अशी प्रतिक्रिया दिली.