अंजली दमानिया यांच्या उमेदवारीवरून आम आदमी पक्षात धुसफूस सुरूच असून त्यातून येथे नागपूर आम आदमी पार्टी नावाने वेगळीच चूल मंगळवारच्या मुहूर्तावर मांडण्यात आली आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातून भाजपतर्फे नितीन गडकरी निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसपेक्षाही आम आदमी पक्ष गडकरींविरोधात अधिक सक्रिय असून त्याने पक्षाच्या महाराष्ट्र प्रभारी अंजली दमानिया यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दमानिया यांच्या उमेदवारीवरून आम आदमी पक्षात प्रचंड नाराजी पसरली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. रूपाताई कुळकर्णी या सक्षम उमेदवार असताना त्यांची मुलाखत घेऊनही त्यांना उमेदवारी नाकारली. नागपुरात सक्षम कार्यकर्ते नाहीत काय, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते व पक्षाचे प्रमुख समर्थक मोहन कारेमोरे यांनी केला आहे. डॉ. रूपाताई कुळकर्णी यांना उमेदवारी नाकारून नागपुरातील कार्यकर्त्यांवर पक्षाने अविश्वासच दर्शविला असल्याचे कारमोरे यांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2014 रोजी प्रकाशित
नागपूर आम आदमी पार्टी नावाने वेगळी चूल
अंजली दमानिया यांच्या उमेदवारीवरून आम आदमी पक्षात धुसफूस सुरूच असून त्यातून येथे नागपूर आम आदमी पार्टी नावाने वेगळीच चूल मंगळवारच्या मुहूर्तावर मांडण्यात आली आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातून भाजपतर्फे नितीन गडकरी निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसपेक्षाही आम आदमी पक्ष गडकरींविरोधात अधिक …
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 19-02-2014 at 03:24 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Differences crop up in aap on damanias