महाड तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री जाकमाता देवीचा नवरात्रोत्सव उद्यापासून (१६ ऑक्टोबर) सुरू होत आहे. सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्त करण्यात आले असून, यावर्षी महाड व्हिजन-२०२० हा विशेष कार्यक्रम पाच दिवस होणार असून महाडकर नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री जाकमाता देवी नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष शांताराम मांगडे यांनी कळविले आहे.
श्री जाकमाता देवीचे शहरातील मंदिर पुरातन देवालय म्हणून प्रसिद्ध आहे. शिवकालांमध्ये पश्चिमेला तटबंदी होती. गावाचे रक्षण करणारी देवी म्हणून तिची स्थापना करण्यात आली. नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांमध्ये देवीविषयी अपार श्रद्धा आहे. अनेक वर्षांपासून गावकरी देवीचा नवरात्र उत्सव भव्य स्वरूपामध्ये साजरा करताना समाजप्रबोधन कार्यक्रम सादर करण्याची प्रथा पूर्वीपासून असल्याने रायगड जिल्हय़ात हे असे एकमेव मंडळ आहे की, उत्सव काळामध्ये करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्याऐवजी लोक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले जातात. श्री जाकमाता नवरात्र उत्सव मंडळातर्फे यावर्षी आगळावेगळा महाड व्हिजन-२०२० कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांमध्ये महाड नगरीचा कारभार हा पारदर्शक असावा, याकरिता जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधील संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपल्या परिसरांतील पाणी, आरोग्य, शिक्षण, बालकल्याण, बांधकाम याबाबतचे सामाजिक प्रश्न मंडळाच्या अध्यक्षांकडे पाठवून देण्याचे आव्हान संयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमांमध्ये नगरपालिकेतील विविध विभागांचे सभापती, सदस्य, नगराध्यक्ष उपस्थित राहाणार असून चर्चात्मक संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक दीपक शिंदे यांनी दिली.

A garba event in Indore has been cancelled in Indore
Garba Cancelled : “हिंदू महिला आणि मुस्लिम पुरुषांमधील संबंध वाढवण्यासाठी गरब्याचं आयोजन”, बजरंग दलाचा आरोप; ३५ वर्षांची परंपरा खंडित!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Extra bus service for Saptshrung Fort in navratri 2024
नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा
pune traffic route changes
Navratri 2024: पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक बदल
Shahala masks, Uran, Navratri festival, loksatta news,
नवरात्रोत्सवात उरणमध्ये शहाळ्याच्या मुखवट्यांची परंपरा
bus services BEST, BEST bus, Mahalakshmi Yatra,
महालक्ष्मी यात्रेनिमित्त बेस्ट उपक्रमाच्या अतिरिक्त बस सेवा
pune get honor to host annual army day parade in january
पुण्याला मिळणार मोठा मान… जानेवारीमध्ये लष्कराचा महत्त्वाचा कार्यक्रम
Lalbagh Ganesh utsav Mandal, Lalbagh Ganesh,
पहिल्याच दिवशी लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या दानपेटीत कोट्यवधींचे दान