पक्षशिस्तीचा बडगा उगारल्याने माथेरानचे माजी नगराध्यक्ष दिलीप गुप्ता आणि त्यांच्या पत्नी माजी उपनगराध्यक्षा वनिता गुप्ता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.
निवडणुकीत खोटे अफेडेव्हिट सादर केल्याप्रकरणी आणि अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी माथेरानचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक दिलीप गुप्ता आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका वनिता गुप्ता यांच्या विरोधात जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पद रद्द होण्यासाठी अपिल करण्यात आली आहे. कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या माजी महिला अध्यक्षा आशाताई कदम यांनी हे अपिल केले आहे. माथेरानमध्ये एक मजली इमारतीच्या बांधकाला परवानगी असताना गुप्ता यांनी नगराध्यक्ष झाल्यावर दोन मजले बांधल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या अपिलावर सध्या सुनावणी सुरू आहे.   दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या अपिलामुळे गुप्ता कुटुंबीयांचे नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरसेवक पद वाचवण्यासाठी गुप्ता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या माथेरानमध्ये रंगते आहे.

Story img Loader