उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांणा उधाण आलं होतं. पण, ही पूर्वनियोजित भेट होती. रयत शिक्षण संस्थेतील अडचणींबद्दल शरद पवारांबरोबर चर्चा झाल्याची माहिती दिलीप वळसे-पाटलांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार यांच्या मोदी बाग निवासस्थानाबाहेर दिलीप वळसे-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वळसे-पाटील म्हणाले, “रयत शिक्षण संस्थेतील काही अडचणींबद्दल अध्यक्ष शरद पवारांबरोबर चर्चा झाली. या बैठकीत रयत शिक्षण संस्थेतील अन्य पदाधिकारीही होते.”

“अशा भेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही. वसंतदादा शुगर, रयत शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, राज्य कारखाना आणि राष्ट्रीय कारखाना संघ या संस्थांवर मी काम करतोय. येथे काम करताना नेहमीच शरद पवारांचं मार्गदर्शन घेत आलो आहे. आज सहकारी संस्थांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती संदर्भात सरकारने केलेल्या उपाययोजनांबद्दल शरद पवारांशी चर्चा केली,” असं वळसे-पाटलांनी म्हटलं.

हेही वाचा : “शरद पवारच खरे ओबीसी नेते, कारण…”, बच्चू कडूंचं विधान

संस्थात्मक राजकारणात अंतिम शब्द शरद पवार की अजित पवार यांचा? या प्रश्नावर वळसे-पाटील म्हणाले, “शरद पवार अनेक संस्थांवर अध्यक्ष आहेत. त्यामुळे शरद पवार यांचाच अंतिम शब्द असणार आहे.”

“राजकीय भूमिका हा वेगळा प्रश्न आहे. या संस्था समाजाच्या आहेत. संस्थांमध्ये शरद पवार यांनी कधीही राजकारण आणलं नाही. संस्थांमध्ये सर्व पक्षांची लोक आहेत,” असं वळसे-पाटलांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : “धर्माची भाषा तुमच्या तोंडून शोभत नाही”, अजित पवार गटातील नेत्यानं आव्हाडांना सुनावलं; दिलं ‘हे’ आव्हान

आंबेगाव ग्रामपंचायतीत बदल झाला आहे. फुटीचा फटका बसला का? असा प्रश्न विचारल्यावर वळसे-पाटील म्हणाले, “३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. त्यात २४ सरपंच आमच्या विचाराचे निवडून आले आहेत. ४ स्थानिक आघाड्या आणि २ शिंदे गटाला मिळाल्या आहेत. आंबेगाव ग्रामपंचायतीत थोडा बदल झाला आहे. निवडणुकीत काही स्थानिक पातळीवरील प्रश्नांचा परिणाम झाला असावा. आंबेगावाला जाऊन स्थानिकांशी चर्चा करेल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip walse patil meet sharad pawar comment on ajit pawar in pune ssa
Show comments