Dilip Walse Patil On Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये पार पडला. या मंत्रिमंडळामध्ये महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे महायुतीमधील काही नेते नाराज झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, दिलीप वळसे पाटील यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

तसेच छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. एवढंच नाही तर जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असं सूचक विधान करत आपण कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हटलं. त्यामुळे आता छगन भुजबळ नेमकं काय भूमिका घेणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. तर छगन भुजबळ यांची नाराजी दूर केली जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. आता दिलीप वळसे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत भाष्य केलं आहे. भुजबळांच्या नाराजीबाबत विचालं आलं असता वळसे पाटील म्हणाले की, ‘छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत, ते नाराज होऊ शकतात’, असं वळसे पाटील यांनी म्हटलं. ते झी २४ तास या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आम्ही ‘वार’ आडनाव असलेल्यांचा सन्मान करतो, कारण…”, मुनगंटीवार, वडेट्टीवारांचा उल्लेख करत फडणवीस काय म्हणाले?
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

हेही वाचा : “मला जी वागणूक दिली, अपमानित केलं, म्हणून मी…”, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं विधान

तुमची पक्षावर नाराजी आहे का?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्यामुळे दिलीप वळसे पाटील हे देखील नाराज झाल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, यासंदर्भात वळसे पाटील यांनी स्वत: प्रतिक्रिया देत म्हटलं की, “पक्षावर माझी काहीही नाराजी नाही. पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे.”

भुजबळांच्या नाराजीवर वळसे पाटील काय म्हणाले?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांच्यासह अनेकजण नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच तुम्ही देखील नाराज आहात का? असा प्रश्न विचारला असता यावर वळसे पाटील म्हणाले, “छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत. तसेच अनेक जण नाराज देखील असतील. मात्र, मी नाराज नाही”, असं वळसे पाटील यांनी म्हटलं.

Story img Loader