एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेना मोठी फूट पडली आहे. शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. बिंधास्तपणे विधान करणाऱ्या राऊतांवर सातत्याने टीका केली जात आहे. मात्र, आता राऊतांनी संयम बाळगून पुढाकार घेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणावे असे आवाहन शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केले आहे. दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही वाचा- “वेट अँड वॉच”, संजय राऊतांचं सूचक ट्वीट; राजभवनातला तो फोटो शेअर करत म्हणाले, “दिया तो कब्र पर…!”
मान-अपमान बाजूला ठेऊन एकत्र या
उद्धव ठाकरे हे आमचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्याकडे आम्ही वडीलधारे म्हणूनच पाहतो. शिवसेनेत दोन गट पडावे, अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येण्यातचं शिवसेनेच भलं असल्याचं दिपाली सय्यद म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी बंडखोर आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमी उघडे असतील असं सांगितलं आहे. त्यामुळे मान-अपमान बाजूला ठेऊन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
पाहा व्हिडीओ –
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर सूचक ट्वीट
दिपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत सूचक ट्वीट केले आहे. येत्या दोन दिवसात शिंदे आणि ठाकरे चर्चेसाठी एकत्र येतील असे सय्यद यांनी ट्वीटमध्ये म्हणले आहे. तसेच या भेटीसाठी भाजपा नेत्यांनी मध्यस्थी केल्यामुळे त्यांचेही आभार मानण्यात आले आहेत. दिपाली सय्यद यांच्या ट्वीटमुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार की काय? अशा चर्चा सगळीकडे रंगू लागल्या आहेत.