जीएसटी कायद्यांतर्गत राज्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील व्यापारी मोदसिंग पद्मसिंह सोढा यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. जीएसटी कायद्यांतर्गत पुण्याच्या जीएसटी कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. 79 कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी सोढा यांना मुंबईतून 26 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यावेळी न्यायालयाने सोढा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.