नैसर्गिक आपत्ती मग ती कोणतीही असो, टाळता येत नसली री अशा संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्याची पूर्वतयारी असली तरी त्यावर मात करून जीवित व वित्तहानी टाळणे आपल्या हाती आहे. यासाठीच रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आणि सतर्क केली आहे. याकामी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी सर्व यंत्रणा सजग केल्या आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, वादळ अशा अनेक नसíगक आपत्तींना  प्रशासनाला तोंड द्यावे लागते. मात्र जिल्हा प्रशासनाने संभाव्य आपत्तींना समर्थपणे मुकाबला करण्याची दमदार तयारी केली असून यासाठी जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर आपत्ती निवारणार्थ यंत्रणा गतिमान केली आहे. धरण क्षेत्रात तसेच गावागावात पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहेत. आपत्ती निवारणार्थ आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे.
संभाव्य आपत्तीचा धोका डोळ्यासमोर ठेवून मदत आणि बचाव कार्यासाठी यंत्रणा सज्ज आणि सतर्क ठेवली आहे. विविध पातळ्यांवर प्रशिक्षित कर्मचारी तसेच स्वयंसेवकांची फळी तयार ठेवली आहे. यापूर्वीच्या आपत्ती धोक्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी आवश्यक खबरदारी घेण्यात आली
असून आपत्ती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजना तयार ठेवल्या आहेत. दुर्दैवाने आपत्ती उद्भवल्यास करावयाची पर्यायी व्यवस्थाही तयार ठेवली आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित केले आहेत. सर्व यंत्रणांमध्ये परस्पर सुयोग्य समन्वय ठेवण्यासही प्राधान्य
दिले आहे. जिल्ह्य़ात आपत्ती नियंत्रण कक्ष तसेच आपत्ती धोके व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असून टोल फ्री नंबर १०७७ असा आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्य़ाचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून अजय सूर्यवंशी कार्यरत
आहेत. पावसाळ्यात प्रामुख्याने पूर, अतिवृष्टी, वादळ, भूकंप, डोंगर- दरडी कोसळणे अशा अनेक नसíगक आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा आपत्ती येण्यापूर्वीच आपत्ती धोके व्यवस्थापन कार्याक्रमांतर्गत संभाव्य आपत्तींचा सामना करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यानुसार आपत्ती येण्यास कोणकोणती महत्त्वाची कारणे आहेत, त्या कारणांचा अभ्यास करून आपत्ती येण्यातील धोके कमी करण्यावर विशेष उपक्रमांद्वारे भर दिला गेला आहे. आपत्ती निवारणाच्या कामात प्रशासनाने लोकसहभाग हा घटक महत्त्वाचा मानला असून लोकांचा प्रत्यक्ष सहभाग घेण्यास सर्व पातळ्यांवर प्राधान्य दिले आहे. प्रशासनाच्या सजग आणि दक्ष भूमिकेमुळे संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्याची धिटाई लोकांमध्ये निर्माण होईल. आपत्ती निवारणाच्या कार्यक्रमात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. कारण आपत्तीत बळी पडणारा घटक हा सर्वसामान्य माणूसच असतो. म्हणून या घटकालाच आपत्तीला
सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षित व सक्षम केल्यास खऱ्या अर्थाने आपत्ती-धोके व्यवस्थापन होऊ शकते. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्य़ात त्यादृष्टीने लोकसहभागाबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र छात्रसेना, स्वयंसेवी संस्था, युवक व महिला मंडळे, गावपातळीवर आरोग्य कार्यकर्ती यांचेही सहकार्य घेण्यासही प्राधान्य दिले आहे. शिवाय अगदी गावपातळीपासून ते जिल्ह्य़ाचा आपत्कालीन कृती आराखडाही तयार करण्यात आला असून त्यानुसार संभाव्य काळात कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हा सौम्यीकरण उपाययोजनांतर्गत आपत्ती-धोके व्यवस्थापन विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रबरी बोटी, लाइफ जॅकेटस्, लाइफ बोये, इन्फ्लाटेबल, लायटिंग टॉवर, फ्लोटिंग पम्प, चेन सॉ कटर, काँक्रिट कटर, सर्च लाइट, हेल्मेट, रिफ्लेक्टिव्ह जॅकेटस्, रेस्क्यू किट, स्ट्रेचर्स इ. साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. हे साहित्य वापरण्याचे प्रशिक्षण संबंधितांना देण्यात आले आहे. जिल्ह्य़ात दरड कोसळण्याच्या घटनांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून संबंधित विभागाने केलेल्या शिफारशीनुसार संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसविण्यासही प्राधान्य दिले आहे. अतिवृष्टी झाल्यास त्या गावातील नागरिक सुरक्षितस्थळी जाऊ शकतील. तसेच दरड कोसळण्याच्या घटनांचा बारकाईने केलेला अभ्यास स्थानिक अधिकारी/ कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांना कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्य़ात पूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी, डोंगर-दरडी कोसळणे यांसारख्या नसíगक आपत्ती नवीन नाहीत. या आपत्तीवर मात करण्यासाठी आपत्ती-धोके व्यवस्थापन कार्यक्रमाद्वारे मिळणारे प्रशिक्षण, मार्गदर्शन, जनजागृती व समाजप्रबोधनाबरोबरच आपत्ती निवारण कार्यात मिळत असलेला उत्स्फूर्त लोकसहभाग यामुळे
संभाव्य आपत्तीवर आपण निश्चित मात करू शकू आणि जीवित व वित्तहानी टाळण्यात यशस्वी होऊ, असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा