कराड : कृष्णा व कोयना नदीच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाचे सुशोभीकरण करणे, तसेच नवीन कोयना पूल ते नवीन कृष्णा पूल यांना जोडणारा नेकलेस रोड उभारण्यासाठी आमदार अतुल भोसले यांचा पाठपुरावा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अहमदाबादच्या एस.सी.पी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक कौस्तुभ शुक्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी भोसले यांच्या समवेत प्रीतिसंगम परिसराची पाहणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर नदीकाठ सुशोभीकरण, पुरातन वास्तूंचा विकास, कृष्णा घाटावर पायरी मार्ग, खुले प्रेक्षागृह, पर्यटकांसाठी विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्याचा आमदार भोसले यांचा संकल्प आहे.कृष्णा घाटालगत स्वतंत्र नेकलेस रोड उभारून यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाचे सुशोभीकरण करण्याकामी आमदार भोसले यांनी देश-परदेशात भव्य प्रकल्प साकारणाऱ्या अहमदाबादच्या एस. सी. पी. कंपनीचे व्यवस्थापक कौस्तुभ शुक्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रीतिसंगम परिसराची पाहणी केली.

माजी नगरसेवक विनायक पावसकर, हणमंत पवार, शिवाजी पवार, किरण मुळे, सुभाष डुबल, विजय वाटेगावकर, अतुल शिंदे आदींची या वेळी उपस्थिती होती. डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘कराड शहरात सांगली जिल्ह्याकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असल्याने शहराला वाहतूककोंडी होत असते. ही वाहतूककोंडी टाळण्यासाठी नवीन कोयना पूल ते नवीन कृष्णा पूल असा नेकलेस रोड उपयुक्त ठरण्यासह शहराच्या सुशोभीकरणात भर पडणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून, निधी उपलब्ध करून हा पथदर्शी प्रकल्प मार्गी लावण्याचे नियोजन आहे.’