‘लोकसत्ता मिल्क कॉन्क्लेव्ह’मध्ये तज्ज्ञ आणि मान्यवरांची चर्चा

पुणे : ‘दुग्धक्रांतीनंतर पुढे..’ या विषयावर आयोजित ‘लोकसत्ता मिल्क कॉन्क्लेव्ह’मध्ये दुग्धोत्पादनाच्या क्षेत्रापुढील प्रश्नांविषयी आज विचारमंथन होणार असून या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कोणते उपाय करता येतील यावरही चर्चा होणार आहे. त्यामुळे या चर्चेत दुग्धव्यवसायाचे सारेच पैलू समोर येणार आहेत.

दूध आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रासमोरची आजची आव्हाने कोणती, या आव्हानांवर उपाय काय, या आणि अशा विविध प्रश्नांचा वेध ‘लोकसत्ता कॉन्क्लेव्ह’च्या नव्या पर्वात घेतला जाईल. माजी केंद्रीय कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची या कॉन्क्लेव्हमध्ये प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रातील सहकारी आणि खासगी दूध संघांचे पदाधिकारी, या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, अनुभवी व्यावसायिक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती या वेळी असेल. परिषद केवळ निमंत्रितांसाठी आहे.

दूध हा माणसाच्या जीवनपोषणातील महत्त्वाचा घटक आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे दैनंदिन आयुष्यातील अविभाज्य अंग आहेत. दुग्धोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने काही वर्षांपूर्वी क्रांती घडविली. अगदी दुष्काळी भागातही दुधाचा महापूर वाहू लागला. मात्र, त्याने दुग्धोत्पादनाच्या क्षेत्रातील सर्वच प्रश्न आणि समस्या सुटलेल्या नाहीत. याच प्रश्नांचा परामर्श घेण्याबरोबरच त्यावरील ठोस उपायांविषयीची चर्चा ‘लोकसत्ता मिल्क कॉन्क्लेव्ह’मध्ये होईल.

‘लोकसत्ता मिल्क कॉन्क्लेव्ह’

* विषय 

दुग्धक्रांतीनंतर पुढे..

* प्रमुख उपस्थिती *

* शरद पवार

* हरिभाऊ बागडे

बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड प्रस्तुत ‘लोकसत्ता मिल्क कॉन्क्लेव्ह’

सहप्रायोजक :

मारुती सुझुकी-सुपर कॅरी

पॉवर्ड बाय : झुझेर इंजिनिअर्स इंडिया प्रा. लि., गोविंद मिल्क अ‍ॅन्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., पराग मिल्क फूड्स लि., सोनाई ग्रुप इंदापूर, एल. व्ही. डेअरीज पाटस, राजारामबापू पाटील सहकारी दूध संघ.