Mumbai High Court Disha Salian Case Hearing Highlights: जून २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. पण आता या घटनेच्या जवळपास पाच वर्षांनंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच, दिशावर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.

Live Updates

Disha Salian Case Hearing Highlights: सतीश सालियन यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी

13:29 (IST) 2 Apr 2025

"दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या खंडपीठासमोर होणार", वकील निलेश ओझांची माहिती

दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी आजची सुनावणी पार पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले, या प्रकरणाची सुनावणी चुकून न्यायमूर्ती डेरे व न्यायमूर्ती रेवती मोहिते यांच्या खंडपीठासमोर लावण्यात आली होती. मी न्यायालयात नमूद केलं की हा खटला तुमच्याकडे नाही. महिलेविरोधातील गुन्ह्याचं हे प्रकरण न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे जायला पाहिजे. आता सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होईल. न्यायालयाने या खटल्याच्या नोंदीस परवानगी दिली आहे. खटल्याची पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही. न्यायालयाने खूप लांबची तारीख दिली तर आम्ही लवकर सुनावणी व्हावी यासाठी विनंती करू.

12:23 (IST) 2 Apr 2025

Satish Salian on Disha Salian Case: सतीश सालियन यांनी २०२० मध्ये बलात्कार, हत्या झाल्याचा दावा फेटाळला होता

सतीश सालियन यांनी २०२० मध्ये मुंबई पोलिसांना लिहिलेल्या पत्रात दिशा सालियनवर बलात्कार व नंतर तिची हत्या झाल्याचा दावा फेटाळत असल्याचं नमूद केलं होतं.

https://twitter.com/AsYouNotWish/status/1291018981034168321

12:20 (IST) 2 Apr 2025

Disha Salian Case Hearing In Mumbai High Court: दिशा सालियन मृत्यूवेळी नैराश्यात होती - क्लोजर रिपोर्ट

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियन तिच्या मृत्यूआधी नैराश्यात होती, असं नमूद करण्यात आलं आहे. तिचे वडील सतीश सालियन यांच्याकडून पैशांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याच्या कारणामुळे दिशा सालियन नैराश्यात होती, असं या अहवालात म्हटलं आहे.

12:16 (IST) 2 Apr 2025

वाढदिवसानंतर १४ दिवसांनी दिशा सालियनने केलेली आत्महत्या, १४व्या मजल्यावरुन उडी मारली अन्…; तेव्हा नेमकं काय घडलं होतं?

दिशा सालियनचा मृत्यू झाला तेव्हा नेमकं काय घडलं होतं?

वाचा सविस्तर

12:16 (IST) 2 Apr 2025

Disha Salian Case Hearing In Mumbai High Court: सतीश सालियन यांची मागणी

सतीश सालियन यांनी या प्रकरणाची पूर्णपणे नव्याने चौकशी करण्याची मागणी याचिकेमध्ये केली आहे.

12:15 (IST) 2 Apr 2025

Disha Salian Case Hearing In Mumbai High Court: सतीश सालियन यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी

दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार असून त्यांनी दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे.

Disha Salian Case Father Satish Salian letter

दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी २०२० साली मुंबई पोलिसांना पत्र लिहून बलात्कार, खून याची शक्यता फेटाळली होती.

Disha Salian Case Hearing Highlights: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सतीश सालियन यांचे आदित्य ठाकरेंवर आरोप