Disha Salian Death Case Aaditya Thackeray Connection Highlights: तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात काही गंभीर दावे केले आहे. हा खटला महाराष्ट्रातून इतर राज्यात हलवण्यापासून संबंधितांचे सीडीआर रिपोर्ट तपासण्यापर्यंत मागण्यांचा यात समावेश आहे. यासंदर्भात बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी मोठे दावे केले असून त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
Disha Salian Death Case Live Today: दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून पुन्हा वादंग!
Disha Salian Death Case: दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप होताच उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमी वाचा
Disha Salian Death Case Live: “…तरीही मी गप्प बसणार नाही”, आरोप झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची रोखठोक भूमिका
दिशा सालियन प्रकरण तुम्हाला शांत बसविण्यासाठी बाहेर काढले आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले की, तुम्हाला वाटतं का मी गप्प बसेल? केवळ बदनामी करण्यासाठी हे प्रकरण आता बाहेर काढले आहे.
Disha Salian Murder Case Live Updates: "आदित्य ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरे व सूरज पांचोलीही आरोपी"
आदित्य ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरे आणि सूरज पांचोलीही आरोपी आहेत. पोलीस अधिकारीही आरोपी आहेत. या सगळ्यांना ताब्यात घ्या. त्यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट करा. नियोजित वेळेत तपास करा. हा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करा - दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचे वकील निलेश झा यांनी केले गंभीर आरोप
Disha Salian Death Case Live Updates : दिशा सालियनच्या हत्येबाबत वकिलांचे धक्कादायक दावे
रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे खूप जुने संबंध आहेत. जवळपास वर्षापासूनचे आहेत. त्यांचं ४४ वेळा एकमेकांशी संभाषण झालंय. दिशा सालियानची आधी हत्या झाली आणि त्यानंतर पाच दिवसांत सुशांत सिंह राजपूत यांची हत्या झाली. त्यादरम्यान यांचे ४४ फोन कॉल झाले. दिशा सालियानच्या फ्लॅटवर त्या दिवशी आदित्य ठाकरे आणि सूरज पांचोली होते हे सिद्ध करणारे डिजिटल पुरावे, मोबाईल टॉवर लोकेशन आहेत. त्याशिवाय आणखी एक महत्त्वाचा पुरावा मी आत्ता सांगत नाही, तोही आहे. हे सगळे पुरावे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या फाईलमध्ये समीर वानखेडे यांच्याकडे आहेत - दिशा सालियनचे वडील सतीष सालियन यांचे वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक दावे
Disha Salian Death Case: ‘दिशा सालियनवर बलात्कार, खून झाला नाही’ वडिलांचे ते पत्र व्हायरल
२०२० मध्ये सतीश सालियन यांनी मालवणी विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप यादव यांना एक पत्र लिहिले होते. वाचा पत्रात काय म्हटले
Disha Salian Case: दिशा सालियनचा मृत्यू झाला ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं होतं?
८ जून २०२० च्या रात्री दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. त्यादिवशी रात्री नेमके काय घडले? याबाबत दिशाच्या एका मित्राने माहिती दिली होती. वाचा सविस्तर वृत्त
Disha Salian Death Case Live Updates : अस्लम शेख म्हणतात, आता यातून काहीही समोर येणार नाही!
दिशा सालियनची हत्या की आत्महत्या हे पोलिसांनी तपासात स्पष्ट केलं आहे. तिच्या वडिलांना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. सीआयडी, क्राइम ब्रांच, स्थानिक पोलिस अशा सर्व तपास यंत्रणांनी तपास केला आहे. सगळ्यांच्या तपासात असं काहीही समोर आलेलं नाही. त्यामुळे मला वाटत नाही यातून नवीन काही समोर येईल. आज इतक्या दिवसांनी हा दावा का केला जातोय हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
आत्ता हे प्रकरण हायलाईट करण्यामागचं कारण एकच आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या जनतेला देण्यासारखं काहीच नाहीये. त्यामुळे मग कधी औरंगजेब दिसतो, कधी स्टॅलिन दिसतो, कधी दंगलीचा मुद्दा समोर येतो - अस्लम शेख, काँग्रेसचे आमदार, मुंबईचे माजी पालकमंत्री
Disha Salian Murder Case Live Updates:
किशोरी पेडणेकर वारंवार दिशाच्या कुटुंबीयांकडे गेल्या होत्या हे सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे त्यासाठी वेगळ्या काही पुराव्याची गरज नाही - शिंदे गटाच्या आमदारांचा दावा
Disha Salian Murder Case Live Updates: सत्ताधाऱ्यांचं विधानभवनाबाहेर आंदोलन
दिशा सालियन हत्या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधक अधिवेशनात आमनेसामने आले आहेत. दिशाच्या वडिलांच्या आरोपांनंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी "दबाव आणला कशाला, न्याय हवा दिशाला" असं लिहिलेले फलक हातात धरून आंदोलन केलं.
Disha Salian Death Case Live Updates : दिशाने शेवटचा कॉल पोलिसांना लावला होता का?; जाणून घ्या सत्य..
दिशाने मृत्यूपूर्वी १०० क्रमांकाला फोन केल्याची चर्चा
Disha Salian Death Case Live Updates : यापूर्वीही नारायण राणे, नितेश राणेंनी केले होते असे आरोप
नारायण राणे, त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी सुरुवातीपासून या प्रकरणात दिशावर सामुहिक बलात्कार झाल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी हा मुद्दा चर्चेला आला असता त्यावर आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं होतं.
Disha Salian Murder Case Live Updates: पार्टीत राजकीय नेते उपस्थित नव्हते - तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग काय म्हणाले होते?
Disha Salian Death Case Live Updates : तीन वर्षांपूर्वी काय होती दिशाच्या कुटुंबीयांची भूमिका?
दिशाच्या वडिलांनी आत्ता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, तीन वर्षांपूर्वी दिशाच्या आईने "सध्या चाललेल्या राजकारणातून माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, आम्हाला काही झाले तर त्यासाठी हे लोक जबाबदार असतील", अशी भूमिका मांडली होती.
Disha Salian Was Raped, Murdered? : दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? मैत्रिणीने केला खुलासा
दिशाने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पण त्यापूर्वी काय घडलं?
Disha Salian Case : ‘माझ्या मुलीची हत्या झाली’, दिशा सालियनच्या वडिलांचा गंभीर आरोप; केली ‘ही’ मोठी मागणी
Disha Salian Death Case Live Updates : "दबाव नव्हता पण..."
२०२२ मध्ये तुमच्यावर कोणाचा दबाव होता का? या प्रश्नावर बोलताना सतीश सालियन यांनी म्हटलं की, “माझ्यावर कोणाचाही कोणताही दबाव नव्हता. मात्र, मला तशा प्रकारे पटवून सांगण्यात आलं होतं. तसेच दिशा सालियन बरोबर जे होते ते कधीही खोटं बोलणार नाहीत असा विश्वास मला तेव्हा वाटला होता. तसेच तेव्हा आम्हाला पोलिसांनी देखील सांगितलं होतं की ही आत्महत्या आहे. तेव्हा आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवला होता”, असं सतीश सालियन म्हणाले आहेत.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी रिपब्लिक या वृत्तवाहीनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. दिशा सालियनची आत्महत्या होती की हत्या? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला असता यावर सतीश सालियन यांनी म्हटलं की, “एकंदरीत संपूर्ण तपास पाहता मला असं वाटतं की ही हत्याच आहे. कारण एखाद्या व्यक्तीची बॉडी १४ व्या मजल्यावरून पडते, पण तरीही त्या व्यक्तीच्या बॉडीवर एकही जखम दिसून येत नाही. डोक्यावरही कुठे जखम होत नाही, मग असं कसं होऊ शकतं? यावर विचार करायला हवा. १४ व्या मजल्यावरून जर बॉडी पडली तरी ती बॉडी क्लिन कशी राहू शकते?”, असा सवाल सतीश सालियन यांनी उपस्थित केला.
Disha Salian Was Raped, Murdered : दिशा सालियनची बलात्कारानंतर हत्या झाली होती - वडिलांचा दावा
दिशा सालियानवर सामुहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली होती, असा गंभीर दावा दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली आहे.
Disha Salian Death Case Live Updates : दिशा सालियानच्या वडिलांची पत्रकार परिषद
बुधवारी दिशा सालियानच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर दावे केले. या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवं राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Disha Salian Murder Case Live Updates: दिशा सालियान प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद उमटणार?
पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून पुन्हा वाद निर्माण झाला असून त्याचे पडसाद आज अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
दिशा सालियन ( संग्रहित छायाचित्र )
Disha Salian Death Case Live Today: दिशा सालियानचा मृत्यू की हत्या? वडिलांच्या दाव्याने संशय बळावला!