Disha Salian Death Case Aaditya Thackeray Connection Highlights: सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्याअनुषंगाने पुन्हा एकदा या प्रकरणावरून वाद निर्माण झाला असून शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे आमदार व उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांना सत्ताधाऱ्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. त्यापाठोपाठ दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे व सूरज पांचोली हेही आरोपी असल्याचं खळबळजनक विधान केलं आहे.
Disha Salian Death Case Highlights Today, 21 March 2025: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स
Disha Salian Murder Case Live Updates Today: रोहित पवारांनी थेट बिहार निवडणुकांशी जोडलं कनेक्शन!
अधिवेशन आलं की यांना औरंगजेब आठवतो. अधिवेशन आलं की दिशा सालियन यांना आठवते. अधिवेशन संपलं की आता बिहारची निवडणूक येतोय. त्यानुसार तुम्हाला दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत आठवले आणि आज निवडणूक संपलं की तुम्ही या सगळ्यांना विसरता. एसआयटीला विसरून जाता - रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार
Disha Salian Death LIVE Updates: नागपूर दंगल आणि दिशा सालियन प्रकरण - सुषमा अंधारेंचं विधान
नागपूर दंगल प्रकरण अंगाशी येत असल्याचं पाहूनच दिशा सालियन प्रकरण पुन्हा उकरून काढण्यात आलं आहे - सुषमा अंधारे</p>
Disha Salian Death LIVE Updates: अशा प्रकरणांमध्ये संवेदनशीलपणे बोलायला हवं - सुप्रिया सुळे
कुठल्याही महिलेबद्दल, मग ती कुणाची लेक असेल, कुणाची सून असेल अशा सगळ्या बाबतीत आपण संवेदनशीलपणे बोलायला हवं. उद्धव ठाकरे काल दिशा सालियन प्रकरणावर सविस्तर बोलले आहेत. जे काही आहे, ते राज्याच्या समोर आहे - सुप्रिया सुळे</p>
Disha Salian father files FIR Against Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची भूमिका...
ही सगळी चर्चा कोर्टाच्या केसमुळे सुरू झाली. उच्च न्यायालयात एका वकिलानं याचिका दाखल केली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनीही एक मुलाखत दिली आहे. शासनाची भूमिका यासंदर्भात पक्की आहे. न्यायालय काय म्हणतंय? न्यायालयात ते काय पुरावे देत आहेत? यावर पुढची भूमिका ठरेल. त्यामुळे आत्तातरी शासनाच्या किंवा पोलिसांच्या पातळीवर हा विषय नाही. न्यायालय ज्या प्रकारे आम्हाला आदेश देईल किंवा न्यायालयात जर काही नवीन पुरावे, गोष्टी आल्या तर त्या आधारावर त्या वेळी सरकार निर्णय घेईल. आत्तातरी आम्ही न्यायालयाकडे नजर ठेवून आहोत - देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
Disha Salian Death LIVE Updates: पाच वर्षांत असं काय घडलं? - किशोरी पेडणेकरांचा सवाल
या प्रकरणाचा तपास केलेल्या सरकारी तपास यंत्रणा आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कधीच अविश्वास दाखवता येणार नाही. पाच वर्षांनंतर असं काय घडलं? की तुम्ही त्यावेळी सगळ्यांसमोर ती आत्महत्या असल्याचं कबूल केलं. मग आत्ता असं काय घडलंय की कुणी असं घडवून आणलंय का? त्यांना काही गोष्टी बोलण्यास भाग पाडलं जातंय का? आत्ता ते दबावाखाली आहेत असं मला वाटतंय - किशोरी पेडणेकर, तत्कालीन मुंबई महापौर
Disha Salian Murder Case Live Updates Today: दिशा सालियनच्या पालकांनी किशोरी पेडणेकरांना काय सांगितलं?
या प्रकरणावर पोलीसच तपास करतील. मी जेव्हा महापौर होते, तेव्हा दिशा सालियनचे आई-वडील अनेकदा महापौर कार्यालयावर आले होते. आपण कशा स्थितीत आहोत, आम्हाला मार्गदर्शन करा अशी विनंती त्यांनी केली होती. तेव्हा इतरही पदाधिकारी तिथे होते. त्यांचं एकच वाक्य होतं की आमच्या मुलीची जी आत्ता मृत्यूनंतर बदनामी चालू आहे ती होऊ नये. तिनं आत्महत्या केली होती असं त्यांचं तेव्हा म्हणणं होतं. आम्हाला आता त्रास होऊ नये. ती तर निघून गेली, पण आम्हाला जगू द्या असं ते म्हणाले - किशोरी पेडणेकर
Disha Salian Death LIVE Updates: किशोरी पेडणेकर यांनी दिलं वादावर उत्तर
हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. स्वत: आदित्य ठाकरेंनीही याचिका केली आहे. त्यामुळे ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या घडल्या असं ज्यांचं म्हणणं आहे, त्यांना रीतसर कोर्टाच्या माध्यमातून उत्तर दिलं जाईल - किशोरी पेडणेकर
Disha Salian father files FIR Against Aaditya Thackeray: दिशा सालियनच्या मुद्द्यावरून सुषमा अंधारेंची सत्ताधाऱ्यांवर आगपाखड
हे प्रकरण काढायची गरज का वाटते? कारण जेव्हा औरंगजेबाचं प्रकरण काढलं जातं, तेव्हा त्यांना अपेक्षित असतं की विरोधक आम्हाला विरोध करतील. पण आम्ही सांगितलं की आमचं काय देणंघेणं आहे? तुम्हाला कबर उखडायची असेल तर उखडा. आता विरोधकांनी मुद्द्यातली हवा काढली म्हटल्यावर काय करावं? त्यामुळेच दिशा सालियनचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे - सुषमा अंधारे</p>
Disha Salian Death LIVE Updates: दिशा सालयन हत्या की आत्महत्या?
जो कुणी चुकीचं करत आहे, त्याला लागलीच न्यायालयात उभं करून योग्य ती शिक्षा त्याला व्हायला हवी. मग तो कुणी मंत्रीपदावर बसलेला व्यक्ती असो किंवा व्यक्ती असो - अबू आझमी
Sushant Singh Rajput Father on Disha Salian Death Case: सुशांत सिंह राजपूतचे वडील काय म्हणाले?
Disha Salian father files FIR Against Aaditya Thackeray: "आत्ताच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा"
आता सरकार बदलले आहे, पूर्वीचे सरकार आणि आताचे सरकार यात खूप फरक आहे त्यामुळे अशी आशा आहे. आताच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला खूप आशा आहे की त्यांच्या पातळीवर जे करतील ते बरोबर करतील - सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह
Disha Salian Murder Case Live Updates Today: सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची प्रतिक्रिया
दिशा सालियनच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंविरोधात याचिका दाखल केल्यानंतर आता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “आधी दिशा सालियनच्या वडिलांनी म्हटलं होतं की, त्यांना काहीही माहिती नाही, ही आत्महत्या असू शकते. नंतर त्यांनी काय संशोधन केलं आणि कोणत्या आधारावर म्हणत आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे, हे मला माहिती नाही. पण त्यांनी जे काही केलं ते योग्य आहे. जे काही घडलं ते हत्या की आत्महत्या होती हे तरी किमान स्पष्ट होईल आणि सुशांतच्या प्रकरणात काय घडले हे देखील समोर येईल, असं ते म्हणाले.
दिशा सालियन हत्या प्रकरणात सतिश सालियन यांच्या वकीलाने गंभार आरोप केले आहेत. (फोटो - इंडियन एक्सप्रेस)
Disha Salian Death Case Highlights Today, 21 March 2025: दिशा सालियनच्या वडिलांच्या आरोपांमुळे राजकीय खळबळ