अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि सुशांतची व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना भाजपा आमदार नितेश राणे सातत्याने लक्ष्य करत आहेत. काल (१२ एप्रिल) रात्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा या घटनांचा पुनरुच्चार करत लवकरच मोठा गौप्यस्फोट करावा लागेल असा इशारा दिला आहे. जेलच्या भितीने एकनाथ शिंदे भाजपासोबत गेले या शिवसेनेच्या (ठाकरे गट) टीकेला नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, जेलच्या भितीने शिंदे साहेब भाजपाबरोबर गेले, मग पेंग्विन आणि UT ने (उद्धव ठाकरे) दीशा सालियनच्या खटल्याच्या भितीने कोणा-कोणाचे हात पाय पकडले. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले? हा पण गौप्यस्फोट करायला लागेल, लवकरच. ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी हैं’

हे ही वाचा >> “भाजपाबरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील, एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर येऊन रडले”, आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

नितेश राणेंनी याआधीही आरोप केले आहेत

“दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी बोलत राहावं, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. असं काही दिवसांपूर्वी नितेश राणे म्हणाले होते. राणे म्हणाले होते की, आदित्य ठाकरे जेवढं बोलतील तेवढं एसआयटीचं काम सोप्पं होणार आहे. १४ जूनला आदित्य ठाकरेंचे आजोबा पाटणकर यांचं निधन झालं. पण, १३ जूनला सुशांतसिंह राजपूतच्या घरी घटना झाली, त्याचा उल्लेख आम्ही करत आहोत. १३ जूनला आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा वाढदिवस होता. १३ जूनच्या रात्री २ वाजता आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी एकमेकांना ट्वीटरवर शुभेच्छा देतानाचा संवाद आहे,”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha salian death case nitesh rane accused aditya and uddhav thackeray again asc
Show comments