तब्बल दोन वर्षांनंतर दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झालं आहे. हे वादंग केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी केलेल्या खळबळजनक विधानांमुळे निर्माण झालं आहे. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यासंदर्भात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स बजावलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिशाच्या मृत्यूनंतर नारायण राणे, त्याचे पुत्र नितेश राणे यांनी  दिशाच्या मृ्त्यूबाबत आरोप केले होते. त्यामुळे सालियन कुटुंबीयांची बदनामी झाल्याबाबत त्यांनी दोन वेळा मालवणी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. १९ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.

मालवणी पोलिसांनी नारायण राणेंना समन्स बजावले आहेत. ३ मार्च रोजी अर्थात गुरुवारी नारायण राणेंना मालवणी पोलिसांसमोर हजर राहाण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलं आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नारायण राणेंनी केलेल्या दाव्यांबाबत त्यांचा जबाब यावेळी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नारायण राणेंसोबतच नितेश राणे यांना देखील पोलिसांनी पाचारण केलं असून ४ मार्च रोजी नितेश राणे यांना मालवणी पोलिसांसमोर हजर राहाण्यास सांगण्यात आले आहे.

“नितेश कलाकार बनतोय याचा आनंद, म्याव म्याव…”, नारायण राणेंचा खोचक टोला!

काय म्हणाले होते नारायण राणे?

काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला होता. “खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस” आणि आपण कुठे धावणार?,” असे राणेंनी म्हटले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha salian murder case narayan rane nitesh rane summoned by malvani police pmw