शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होती. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना प्रश्न विचारण्यात आले. भरत गोगावले यांना ६६ प्रश्न विचारले गेले. त्यावेळी भरत गोगावले यांनी मार्मिक उत्तरं दिली. त्यांची टोलेबाजी आणि हजरजबाबीपणा हा चर्चेचा विषय ठरला.

काय घडलं सुनावणीच्या दरम्यान?

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी विचारलेल्या प्रश्नांवर भरत गोगावलेंनी जोरदार बॅटिंग केली. ज्यामुळे सुनावणीतही हशा पिकला. तुम्ही सूरतला का गेले असं विचारलं असता छत्रपती शिवाजी महाराज सूरतले गेले होते म्हणून मी गेलो होतो असं उत्तरही त्यांनी दिलं.

rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”
Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Ajit Pawar responded to opposition objections on evm machine despite mahaviaks aghadi Lok Sabha loss
लोकसभा निकालानंतर ‘ईव्हीएम’ला दोष देत बसलो नाही, अजित पवार यांची विरोधकांवर टीका
Sharad Sonawane Image.
Sharad Sonawane : “…तर किंमत थोडी वाढली असती, माझा पालापाचोळा झाला”, अपक्ष आमदाराचे वक्तव्य अन् सभागृह खळखळून हसलं
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…

वकील देवदत्त कामत : विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या सरकारच्या बाजूने तुम्ही मतदान केलं का?

भरत गोगावले: होय

कामत: भारताच्या शेड्युल्ड १० नुसार आपण स्वतःवर अपात्रतेची कारवाई ओढवून घेतली हे खरं आहे का?

गोगावले : हे खोटं आहे.

कामत: जून २०२२ मध्ये तुम्ही सूरतला कधी गेलात?

गोगावले : मी २० जून रोजी सूरतला प्रस्थान केले.

कामत : तुम्ही सूरतला कसे पोहचलात आणि किती आमदार बरोबर होते?

गोगावले : मी सूरतला कारने गेलो, माझ्या कारमध्ये मी एकटाच होतो.

कामत : २० जून २०२२ या दिवशी महाराष्ट्रातून जाण्यासाठी तुम्ही सूरत का निवडलंत?

गोगावले: सूरत चांगले ठिकाण आहे हे मी ऐकले होते. त्यामुळे आपण व्यक्तीश: जाऊन ते ठिकाण पाहावे म्हणून सूरतला गेलो.

कामत : तुम्ही सूरतला पोहचलात, तेव्हा तिथे इतर आमदार आधीच उपस्थित होते का?

गोगावले : नाही

कामत : तुम्ही सूरतला पोहचल्यानंतर इतर आमदार तुमच्या नंतर सूरतला पोहचले का?

गोगावले : मी पहिलाच होतो, बाकीचे आमदार मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथे आले.

कामत: जे आमदार तुमच्यानंतर सूरतला आले, त्यांना तुम्ही कळवलं होतं का? की त्यांना तुमच्या आधीच त्या ठिकाणी यायचं हे माहीत होतं?

गोगावले : याबाबत मला माहिती नाही, मात्र मी तिथे गेल्यानंतर ते तिथे आले आणि त्यांच्याशी माझी भेट झाली.

कामत : सूरतमधल्या एकाच हॉटेलमध्ये सगळ्या आमदारांनी जाणं हा योगायोग नव्हता, तर पूर्वनियोजित कार्यक्रम होता हे बरोबर आहे का?

गोगावले: ते मला माहीत नाही. ते तिकडे कसे आले हे त्यांनाच माहीत असेल. शिवाजी महाराज तिकडे गेले, म्हणून मला वाटलं की सूरत चांगलं ठिकाण असणार म्हणून मी तिकडे गेलो.

२० जून २०२२ या दिवशीच महाराष्ट्रातलं सर्वात मोठं बंड झालं होतं. शिवसेनेत इतकी मोठी फूट याआधी कधीच पडली नाही. एकनाथ शिंदे यांनी आमदारांना बरोबर घेतलं आणि ते आधी सूरत आणि मग गुवाहाटीला गेले. आता आमदार अपात्रता सुनावणीच्या दरम्यान जी उलट तपसाणी सुरु आहे त्यात भरत गोगावले यांनी गुवाहाटीबाबत विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरं दिली. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

गुवाहाटीला जाण्याबाबत काय काय विचारलं गेलं?

कामत : आपल्या बरोबर इतर सगळे आमदार सूरतहून गुवाहाटीला गेले का?

गोगावले : होय, आम्ही गुवाहाटीला गेलो.

कामत: तुम्ही स्वतःचं तिकिट काढून गेलात की तुमची तिकीटं कुणी काढली होती?

गोगावले : आम्ही स्वतःच्या खर्चाने गेलो. कामाख्या देवीचं दर्शन स्वतःच्या पैशांनी घेणंच योग्य आहे.

कामत : गुवाहाटीमध्येही तुम्ही सगळे एकत्र एकाच हॉटेलमध्ये थांबला होतात हे खरं आहे का?

गोगावले: होय. आम्ही सगळे मित्र असल्याने एकाच हॉटेलमध्ये राहिलो.

कामत : तुम्ही तेव्हा जी कृती केलीत त्यामुळे उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेलं सरकार पाडण्याचं काम केलं हे खरं आहे का?

गोगावले : नाही. हे खरं नाही.

कामत : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्हाला मंत्रिपद होतं का?

गोगावले : नाही

कामत : जून २०२२ ते जुलै २०२२ या कालावधीत दिलेल्या मुलाखतींमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलीत हे खरं आहे का?

गोगावले: इच्छा प्रत्येकाची असते, मी मंत्री झालो का? मी अजूनही मंत्री झालेलो नाही. (इथे सुनावणीत पुन्हा हशा पिकला.)

कामत : तुम्हाला मंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या सरकारचा आमदार म्हणून पाठिंबा काढून घेतला हे खरं आहे का?

गोगावले : हे खोटं आहे.

कामत : आपल्या प्रतिज्ञापत्रातील परिच्छेद क्रमांक १ ते २६ हे चुकीचे आणि निराधार आहेत, हे खरे आहे का?

गोगावले : हेदेखील खोटे आहे.

Story img Loader