जिल्हा अॅथलेटिक संघटनेच्या वतीने १५ व १६ डिसेंबर रोजी येथील भोसला सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर कनिष्ठ अॅथलेटिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्य़ातून सुमारे तीन हजार स्पर्धक सहभागी होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या स्पर्धेत प्रथमच सहा वर्षांआतील गटही ठेवण्यात आला आहे. या गटात ३० मीटर, ५० मीटर धावणे, लांब उडी, रिले अशा स्पर्धा होतील. याशिवाय आठ, १०, १२, १४, १६ व १८ वर्षांआतील गटांसाठीही धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, हातोडा फेक, थाळी फेक अशा स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी विलास पाटील, पोलीस उपसंचालक हरीश बैजल, जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे, विश्वास ठाकूर, भीष्मराज बाम आणि आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र दिले जाणार आहे. १२ ते १४ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपदासाठी या स्पर्धेतून नाशिक जिल्ह्य़ाचा संघ निवडण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे पावसाळ्यात होणारी १६ व १८ वर्षांआतील स्पर्धाही या वेळी घेण्यात येणार आहे. या वेळी स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष गंगाधर जाधव, सचिव पद्माकर घुमरे यांसह संघटनेचे सचिव हेमंत पांडे, उपाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, सहसचिव अनिल वाघ, रवींद्र मेतकर, सुनील तावरगेरी आदी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी दत्ता जाधव ९८९०३३४२९३, पद्माकर घुमरे ९७६३६६३१०७ यांच्याशी संपर्क साधावा.

Story img Loader